Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी केंद्राकडून राज्यांना लस उपलब्धततेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

केंद्राकडून राज्यांना लस उपलब्धततेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोफत लसीच्या घोषणेनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेसाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यांना लस पुरवठा करताना लसीकरण मोहीमेअंतर्गत या लशी कशा पद्धतीने पुरवाव्यात याबाबतच्या या सूचना आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार Covid-19 लसीचे डोस हे केंद्राकडून राज्य सरकारला मोफत पद्धतीने देण्यात येतील. केंद्राकडून राज्याला लसी देतानाच राज्यांच्या तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येनुसार, कोरोनाच्या रूग्णसंख्येनुसार आणि लसीकरणाच्या मोहीमेनुसार यापुढच्या काळात लस देण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजे २१ जूनपासून लस मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. लसीच्या पुरवठ्यामध्ये वाया जाणाऱ्या लसींचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे केंद्राने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे.

लसीकरणासाठी कोणाला प्राधान्य ?

केंद्राकडून राज्य सरकारला लस देताना आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, ४५ वयोगटावरील नागरिक आणि ज्या व्यक्तींचा दुसरा डोस शिल्लक आहे, अशा व्यक्तींना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. राज्य सरकारला लस दिल्यानंतर १८ वर्षांवरील वयोगटासाठी कशा पद्धतीने लस द्यायची याचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला देण्यात आला आहे, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार केंद्र सरकारकडून एकुण उपलब्ध लसीच्या कोट्यापैकी ७५ लसी या केंद्राला उपलब्ध होणार आहेत. तर २५ टक्के लसीचा कोटा हा खासगी हॉस्पिटलला देण्यात येणार आहे. खासगी हॉस्पिटलला २५ टक्के लस खरेदीची मुभा ही कायम ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारकडे देण्यात आलेल्या जबाबदारीमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये लसीसाठी आकारण्यात येणारे १५० रूपयांसाठीची कमाल मर्यादा तपासण्याचे काम असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार २१ जूनपासून देशात १८ पेक्षा अधिक वयोगटाच्या व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. कोणत्याही आर्थिक स्तरातील व्यक्तीसाठी मोफत लस उपलब्ध करून देण्याची ही भारतातील मोठी लसीकरण मोहीम आहे. ज्या व्यक्तींना लस खरेदी करण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तींना खासगी हॉस्पिटलमध्ये लस खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोक कल्याण

ज्या व्यक्तींना लस खरेदी करता येईल अशा व्यक्तींसाठी खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्राच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील वाऊचर्सदेखील उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मदतीची मोहीम म्हणून लोक कल्याण मोहीम राबविण्यात येईल. सर्व खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी ऑनसाईट नोंदणी प्रक्रियेसाठी राज्य सरकारमार्फत लसीकरणाची प्रक्रिया निश्चित करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळणे शक्य होईल.


- Advertisement -

 

- Advertisement -