घरताज्या घडामोडीManipur Violence : मणिपूर व्हायरल व्हिडीओ प्रकरणी CBIकडून FIR दाखल

Manipur Violence : मणिपूर व्हायरल व्हिडीओ प्रकरणी CBIकडून FIR दाखल

Subscribe

मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरू आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. महिला अत्याचाराप्रकरणी मणिपूरच्या महिलाच रस्त्यावर उतरल्या आहेत. आपल्यावर पुन्हा बलात्कार होऊ नये म्हणून या महिलांनी कंबर कसली आहे.

मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरू आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. महिला अत्याचाराप्रकरणी मणिपूरच्या महिलाच रस्त्यावर उतरल्या आहेत. आपल्यावर पुन्हा बलात्कार होऊ नये म्हणून या महिलांनी कंबर कसली आहे. अशातच आता मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड केल्याची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दखल घेतली आहे. तसेच, याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. सीबीआय अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. (Central Bureau of Investigation registers FIR in Manipur viral video case)

१९ जुलै रोजी महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली. मात्र मणिपूर घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठे यश मिळाले आहे. त्यांच्याकडून तो मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ज्याचा उपयोग दोन महिलांच्या नग्न अवस्थेत धिंड काढल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी केला जात होता.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सीबीआयने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार मणिपूर पोलिसांकडून तपास हाती घेत नवीन एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरमध्ये कलम 153A, 398, 427, 436, 448 302, 354 आणि 364 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेलेची धिंड काढण्याची ही घटना 4 मे रोजी घडली होती. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर 19 जुलै रोजी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि 20 जुलै रोजी पहिली अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘इंडिया’ (INDIA) आघाडी शिष्टमंडळाचा दोन दिवसीय मणिपूर दौरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -