घरताज्या घडामोडीहज यात्रेसाठीचा व्हीआयपी कोटा रद्द, केंद्राचा मोठा निर्णय

हज यात्रेसाठीचा व्हीआयपी कोटा रद्द, केंद्राचा मोठा निर्णय

Subscribe

हज यात्रेमधील व्हीआयपी कोट्याबाबतची संस्कृती संपुष्टात आणण्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने हज यात्रेसाठीचा व्हीआयपी कोटाच रद्द केला आहे. तसेच राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागाही रद्द होणार आहेत. त्यामुळे सामान्य हज यात्रेकरूंना यात्रेची पर्वणी साधता येणार आहे. भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,अल्पसंख्याक मंत्री तसेच हज समितीचे सदस्य यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या जवळपास सर्व व्हीआयपी कोट्याच्या जागा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे मंत्रीही आता सर्व सामान्य यात्रेकरूंप्रमाणेच हजमध्ये सहभागी होतील. कोणासाठीही विशेष व्यवस्था किंवा आरक्षण असणार नाहीये.

मागील दोन वर्षांपासून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनामुळे प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने जगभरातील देशांसाठी प्रवाशांचा कोटाही कमी केला होता. मात्र, यंदाच्या वर्षात हज यात्रेत प्रवाशांना कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीच्या काळात हज यात्रेवर सौदी अरेबियाने घातलेले निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. यावेळी कोरोनाच्या आधी जशी यात्रा व्हायची, त्याचप्रमाणे ही हज यात्रा होणार आहे. भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांसाठीचा कोटा सौदी अरेबियाने भारतातील प्रवाशांचा कोटा २५ हजारांनी वाढवून आता २ लाखांपर्यंत यात्रेकरूंना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर केवळ १८ ते ६५ वयोगटातील लोकांनाच हज यात्रा करण्याची परवानगी होती. त्याच वेळी, सौदी अरेबियाने हजसाठी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी फक्त काही खाजगी कंपन्यांनाच परवानगी दिली होती. मात्र आता हे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. उमराह व्हिसाचा कालावधी ३० दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हज आणि उमराह व्हिसावर येणारे लोक देशातील कोणत्याही शहरात जाऊ शकतात, असं मंत्री तौकीफ अल-रबीह यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Bharat Jodo Yatra : भारत जोडोच्या समारोपाला २१ पक्षांना निमंत्रण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -