घरदेश-विदेशBharat Rice : अवघ्या 29 रुपये किलोने मिळणार 'हा' तांदूळ

Bharat Rice : अवघ्या 29 रुपये किलोने मिळणार ‘हा’ तांदूळ

Subscribe

नवी दिल्ली – महागाईत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. तूर डाळीचे भाव तर दिवसेंदिवस वाढतच आहेत. भाज्यांच्या किमती देखील वाढतानाच दिसत आहेत. या महागाईत थोडा दिलासा म्हणून केंद्र सरकारने मध्यंतरी स्वस्त डाळ तसेच स्वस्त पिठाची विक्री सुरू केली होती. या स्वस्त डाळ आणि पिठानंतर सरकार आता तांदूळही स्वस्त दरात विकणार आहे. या तांदळाची विक्री 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून याची किंमत 29 रुपये प्रति किलो असेल.

सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून ‘भारत’ (Bharat Brand) ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ (Daal) आणि स्वस्त पीठ (Flour) विक्री सुरू आहे. स्वस्त डाळ आणि पिठानंतर आता सरकारने तांदूळही स्वस्त दरात आणला आहे. सर्वसामान्यांसाठी सरकारने ‘भारत तांदूळ’ (Bharat Rice) आणला आहे. या भारत तांदळाची विक्री मंगळवारपासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या भारत तांदळाची किंमत 29 रुपये प्रति किलो असेल.

- Advertisement -

हेही वाचा – Urfi Javed : “मी मेले नाही, फक्त…”, उर्फी जावेदनं उडवली पूनमची खिल्ली

काही महिन्यांपासून तांदूळ, डाळ आणि पिठाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. सरकारने गहू, पीठ आणि स्वस्त तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यापासून तांदूळ, डाळ तसेच पिठाचे भाव वाढले आहेत. महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने भारत ब्रँड आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकार भारत ब्रँड अंतर्गत ‘भारत तांदूळ’ बाजारात आणणार आहे. सरकारने भारत तांदूळ आणला असून पुढील आठवड्यापासून याची विक्री सरु होईल. सरकारने व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील साठा जाहीर करण्याच्या सूचना शुक्रवारी दिल्या, जेणेकरून भाव नियंत्रणात राहता येतील.

- Advertisement -

‘भारत’ तांदूळ कुठे मिळेल?

केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, गेल्या वर्षभरात तांदळाच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्यातीवर बंदी असतानाही तांदळाच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे तांदळाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत तांदूळ बाजारात आणला आहे. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) सहकारी संस्थांमार्फत भारत तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने बाजारात विकला जाईल. याशिवाय केंद्र भंडारच्या रिटेल चेनवरही भारत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ऑनलाईनही मिळणार ‘भारत’ तांदूळ

भारत तांदूळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिला जाईल. पुढील आठवड्यापासून 5 आणि 10 किलोच्या पॅकिंगमध्ये हा तांदूळ लोकांना उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात सरकारने 5 लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. महागाई आटोक्यात येईपर्यंत निर्यातबंदी संपवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तांदूळ निर्यातीवरील बंदी तूर्तास कायम राहणार आहे.

‘भारत आटा’ आणि ‘भारत डाळ’ला चांगला प्रतिसाद

‘भारत आटा’ योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी गव्हाच्या आट्याची २७.५० रुपये किलो दराने विक्री केली होती. तर दिवाळीमध्ये ‘भारत डाळ’ अंतर्गत चणा डाळ ६० रुपये प्रति किलो प्रमाणे विकली होती. या योजनेला ग्राहकांनी चांगली पसंती दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -