घरताज्या घडामोडीSovereign Gold Bond : मोदी सरकारची आजपासून सोन्याच्या प्रति ग्रॅमसाठी मोठी सवलत

Sovereign Gold Bond : मोदी सरकारची आजपासून सोन्याच्या प्रति ग्रॅमसाठी मोठी सवलत

Subscribe

दिवाळीच्या सुरूवातीला पहिला दिवस असतो तो म्हणजे धनतेरस. दिवाळीच्या निमित्ताने लोक जोरदार खरेदी करतात. त्यामध्ये सर्वाधिक खरेदीतील उलाढाल होते, ती म्हणजे सोन्या चांदीच्या खरेदीची. तुम्हीही सोने खरेदीसाठी इच्छुक असाल तर, तुमच्यासाठी आता एक सुवर्णसंधी आहे. ही संधी दवडू नका. ही संधी हातची घालवू नका. कारण सोन्याच्या खरेदीतच योग्य गुंतवणुकीची संधी आहे. केंद्रातील नरेंद मोदी सरकार प्रत्येक १० ग्राम मागे सवलतीच्या दराने सोन्याच्या खरेदीत सूट देत आहे. पण हे सोने प्रत्यक्ष अनुभवता येणार नसले तरीही हे सोने म्हणजे बॉंडच्या रूपातील असे सोने आहे. प्रत्येक १० ग्रॅम मागे जवळपास ५०० रूपयांची सवलत केंद्राकडून सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार आहे.

वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सॉवरेन गोल्ड बॉन्ड २०२१-२२ च्या नव्या टप्प्यानुसार २५ ऑक्टोबरपासून पाच दिवसांसाठी गुंतवणुक केली जाऊ शकते. हे बॉंड २ नोव्हेंबरपासून जारी करण्यात येतील. सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या २०२१-२२ च्या मालिकेनुसार ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत हे बॉंड जाहीर केले जातील. या मालिकेनुसार मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ अशा सहाव्या टप्प्यात बॉंड जाहीर करण्यात येणार आहे. सरकारकडून प्रत्येक १ ग्रॅम सोन्याची किंमत ४ हजार ७६५ रूपये निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रति ग्रॅम ५०० रूपयांची सूट

वाणिज्य मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार गुंतवणुकदारांना ऑनलाईन तसेच डिजिटल स्वरूपात पैसे मोजल्यानंतर प्रत्येक ग्रॅम सोन्यासाठी सवलत देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुक करणाऱ्यांना व्याजाच्या रूपात अतिरिक्त लाभही मिळणार आहे. योजनेअंतर्गत किमान एक ग्राम सोन्याची गुंतवणुक करण्यात येणार आहे.

सोन्याची सुरक्षित खरेदी कुठे कराल ?

अर्थ मंत्रालयाच्या एका खुलाशानुसार २०२१ च्या सीरीज ८ च्या सदस्यत्वाचा कालावधी हा २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर असणार आहे. त्यासोबतच आणखी दोन बॉन्ड हे २ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात येणार आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार या बॉंडच्या खरेदीसाठी छोट्या बॅंकांना वगळून स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याठिकाणी विक्रीसाठी हे बॉंड उपलब्ध असतील.

- Advertisement -

शुद्धतेची गॅरंटी

हे सर्व बॉंड भारतीय रिझर्व्ह बॅंकेद्वारे भारत सरकारकडून जारी केले जातील. त्यानंतर भारतीय सराफा आणि आभूषण संघ लिमिटेडद्वारे प्रकाशित असा ९९९ शुद्धतेचे सोने उपलब्ध होणार आहे. या बॉंडचा कालावधी हा आठ वर्षाचा असेल. तसेच पाच वर्षात बाहेर पडण्याचा पर्यायही या योजनेअंतर्गत असेल.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -