घरट्रेंडिंगनोटबंदीमुळे देशात आली बेरोजगारी; मनमोहन सिंहंनी व्यक्त केली नाराजी

नोटबंदीमुळे देशात आली बेरोजगारी; मनमोहन सिंहंनी व्यक्त केली नाराजी

Subscribe

मोदी सरकारकारच्या नोटबंदीमुळेच देशात बेरोजगारी आल्याचा' घणाघात मनमोहन सिंह यांनी केला आहे.

नोटबंदीच्या निर्णयाला आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, याचा परिणाम अजूनही दिसून येत आहे. २०१६ मध्ये काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदी केली. परंतु, यावर बऱ्याच जणांनी टीका केली आहे. यावर आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देखील टीकास्त्र केले आहे. ‘मोदी सरकारकारच्या नोटबंदीमुळेच देशात बेरोजगारी आल्याचा’ घणाघात मनमोहन सिंह यांनी केला आहे. आर्थिक विषयांवर आधारित ‘थिंक टँक’ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट स्टडीजकडून डिजिटल माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका विकास परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

काय म्हणाले मनमोहन सिंह

मागील काही काळापासून देशात बेरोजगारीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. एकीकडे प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या राष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण देखील तितकेच वाढले आहे. ही चिंताजनक बाब ठरत आहे. २०१६ साली कोणताही विचार न करता घेण्यात आलेला नोटबंदीचा निर्णय पाहता त्याचमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे राज्य आणि तेथील स्थानिक प्रशासनांशी चर्चा न करण्याच्या केंद्राच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, वाढत्या वित्तीय संकटाला आपण फार काळ दूर ठेऊ शकत नाही. तसेच या संकटाला लपवण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येणाऱ्या काही अस्थायी उपायांमुळे कर्जाच्या संकटामुळे उद्योगक्षेत्र प्रभावित होत आहे, असे देखील त्यांनी आपले मत मांडले आहे.


हेही वाचा – विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा भाजप आमदाराचा गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -