घरताज्या घडामोडीमोठा दिलासा! ३८ लाख CGHS लाभार्थ्यांना फक्त एका ई-मेलद्वारे मिळणार आरोग्य सुविधा

मोठा दिलासा! ३८ लाख CGHS लाभार्थ्यांना फक्त एका ई-मेलद्वारे मिळणार आरोग्य सुविधा

Subscribe

केंद्र सरकारने कोरोना काळात ३८ लाख CGHSच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देणार निर्णय घेतला आहे. अनेक कर्मचारी सध्या फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करत आहे. अशा परिस्तिती कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांच्या उपचारात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक विशेष तरतुदी केली आहे. जर कर्मचाऱ्यांना कोणतीही चाचणी करायची असेल किंवा औषध खरेदी करायचे असेल जे सीजीएचएसच्या बाहेरील असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांना सीजीएचएस मुख्यालयात जावे लागणार नाही आहे. परंतु एका ईमेलद्वारे त्वरित त्याची मंजूरी मिळून जाईल. जर कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यात कोरोनाची लक्षणे दिसत असतील आणि त्यांना आरटी-पीसीआर/आरएटी करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याची आवश्यकता आहे, तर हे काम एका ई-मेलद्वारे होऊन जाईल. यासाठी त्यांना सीजीएचएस आरोग्य केंद्रावर यावे लागणार नाही. रिइंबर्समेंटचे नियम बदलले आहेत.

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांनी आरोग्य मंत्रालयाला आवाहन केले की, कोरोना काळात कर्मचाऱ्यांना आपल्या उपचारादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर सीजीएचएसने बऱ्याच प्रकरणात सर्व लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे. जर कोणी लाभार्थी घरीच उपचार करत आहे आणि त्याला अनेक मेडिकल चाचण्या करायच्या आहेत. तर त्याला सीजीएचएस मुख्यालयात येण्याची गरज नाही आहे.

- Advertisement -

नवीन तरतुदीनुसार, घरगुती उपचारांतर्गत कोणी लाभार्थी कोरोनाबाधित झाला किंवा त्याला सुरुवातीला लक्षणे दिसली आणि तो मेडिकल चाचणी करू इच्छित आहे तर त्याला ई-मेल करावे लागले आणि संबंधित केंद्रावर चाचणी करण्यासाठी त्याला मान्यता देण्यात येईल. तसेच त्याला आरटी-पीसीआर/ आरएटी चाचणी करण्यासाठी सीजीएचएस केंद्राच्या सीएमओ किंवा प्रभारी अधिकाऱ्याला ई-मेल करावा लागेल. मेल केलेल्या दिवशी रेफर करण्यासाठीचे आदेश दिले जातील. संबंधित एचसीओ आणि सीजीएचएसच्या यादीत असलेले आरोग्य केंद्र, जिथे चाचणी होईल. तिथे त्या व्यक्तीचे नाव मेलवर लिहिलेले असेल.


हेही वाचा – Corona Vaccination: दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेण्याबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्य मंत्रालय?

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -