केंद्र सरकारकडून ट्विटर इंडियाला शेवटचा अल्टिमेटम, नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

twitter shut down 43 thousand accounts in india action for violation of rules

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विट समोरील अडचणींचा डोंगर काही कमी होण्याचे नाव घेत नाही, एकीकडे ट्विट आणि एलॉन मस्क यांची डील फेक अकाऊंट्स आणि बॉट्समध्ये अडकली असताना दुसरीकडे आता ट्विट इंडियाला भारत सरकारकडून आयटी नियमांचे पालन करण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे ट्विट इंडियाला आता भारताच्या आयटी नियमांचे पालन करत काम करण्यासाठी ही शेवटची संधी असेल.

केंद्राने यापूर्वी 27 जून रोजी ट्विटरला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये ट्विटर 6 आणि 9 जून रोजी पाठवलेल्या नोटिसांच्या सूचनांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले होते. ट्विटरच्या मुख्य अनुपालन अधिकाऱ्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) सांगितले की, Twitter India ने IT कायद्याच्या कलम 69A अंतर्गत पाठवलेल्या सामग्री काढून टाकण्याच्या नोटिसांवर कारवाई करण्यात वारंवार अपयशी ठरले आहे. आयटी नियमांचे पालन करण्याची नवीन अंतिम मुदत 4 जुलै 2022 आहे आणि जर ते तसे करण्यात अयशस्वी झाले तर सरकार कारवाई करू शकते.

याआधी गेल्या वर्षी जूनमध्ये सरकारने ट्विटरला अशीच नोटीस जारी केली होती, ज्यात नवीन आयटी नियमांचे “तात्काळ” पालन करण्याची शेवटची संधी दिली होती. निकषांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास आयटी कायद्यांतर्गत प्लॅटफॉर्मला दायित्वातून मुक्त केले जाईल असा इशाराही दिला.


जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा