घरदेश-विदेशकेंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना दिलासा, ऊसाच्या एफआरपीत 'इतक्या' रुपयांची वाढ

केंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना दिलासा, ऊसाच्या एफआरपीत ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Subscribe

केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एफआरपीमध्ये ( FRP) केंद्र सरकारने टनाला 150 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. मोदी सरकारने यासंदर्भातील कॅबिनेट नोट जारी केली आहे. ऊस उत्पादकांना (Sugarcane growers) या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

ऊसाची फआरपी ( FRP) केंद्र सराकर वाढवण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने संबंधित कॅबिनेटला तशा सूचना दिल्या आहेत.त्यामुळे देशभरातील ऊस उत्पादकांना (Sugarcane growers) मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसापासून टनाला 2900 रूपये दिले मिळत होते. आता यामध्ये 150 रुपयांची वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 3050 रुपये मिळणार आहेत.

- Advertisement -

एफआरपी म्हणजे काय? –

शेतीमालाला ज्या प्रमाणे आधारभूत दर ठरवून दिलेला आहेत. त्याप्रमाणेच केंद्राने जो ऊसाचा दर ठरविला आहे. त्याला एफआरपी म्हणतात. ऊसाचा दर ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचाच असतो. उसाची एफआरपी ही उसाच्या किमान आधारभूत किंमती सारखीच आहे. ज्याच्यावर कोणत्याही साखर कारखान्याला मनमानी करुन कमी-अधिक प्रमाण करता येत नाही. असे असले तरी अनेक राज्यांकडून केंद्राच्या एफआरपीचे पालन होत नाही. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा ही देशातील मुख्य राज्य आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -