Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ; सरकारकडून समितीची स्थापना

मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ; सरकारकडून समितीची स्थापना

Subscribe

मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेता सरकारने केंद्रीय गृहसचिव राजीव गैबा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. आता ही समिती मॉब लिंचिंगसारख्या घटना रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील? याबद्दल सरकारला मार्गदर्शन करणार आहे.

मॉब लिंचिंगसारख्या घटना रोखण्यासाठी सरकारने काय पावलं उचलली? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर सरकारने आता समितीची स्थापना केली आहे. मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेता सरकारने केंद्रीय गृहसचिव राजीव गैबा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. आता ही समिती मॉब लिंचिंगसारख्या घटना रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील? याबद्दल सरकारला मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान, या संदर्भातील रिपोर्ट सादर करण्यासाठी समितीला ४ आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. राजस्थानमधील अलवार येथे रकबार खान यांची गो- तस्करीच्या संशयातून हत्या करण्यात आली. त्यानंतर सरकारने याबद्दल कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला. त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

समितीचे काम काय?

मॉब लिंचिंगसारख्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपयायोजना कराव्यात याचे मार्गदर्शन गैबा समिती करणार आहे. ही समिती नितीन गडकरी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद आदी मंत्र्याकडे हा रिपोर्ट सादर केला जाणार आहे.

राहुल गांधीनी मोदींना केले लक्ष्यॉ

- Advertisement -

दरम्यान, मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटना पाहता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सरकारला लक्ष्य केले आहे. हे मोदींचे NEW INDAI नसून BRUTAL NEW INDAI असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच रखबारला रूग्णालयामध्ये नेण्यासाठी ३ तासांचा वेळ का लागला? पोलिसांनी चहा-पाण्यासाठी देखील वेळ घेतला? असे प्रश्न राहुल गांधी यांनी ट्विटवरून सरकारला प्रश्न विचारले. यावर तुम्ही निवडणुका तोंडावर ठेवून समाजाला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचे उत्तर पियुष गोयल यांनी दिले आहे.

मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ

राजस्थानमधील अलवार जिल्ह्यामध्ये गो- तस्करीच्या संशयातून रकबार खान या तरूणाची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. रकबार खान हा गो- तस्करी करत असल्याचा संशय जमावाला आला. त्यानंतर त्याची ठेचून हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील अलवार जिल्ह्यामध्ये देखील अशीच घटना घडली आहे.

- Advertisement -

कर्नाटकमधील बिदरमध्ये देखील गुगलच्या इंजिनिअरची मुले पळवण्याची टोळी असल्याच्या संशयातून हत्या करण्यात आली होती. मोहम्मद आजम अहमद असं या तरूणाचे नाव होते. मोहम्मद आपल्या मित्रांना भेटायला बिदरमध्ये आला होता. मित्रांना भेटून झाल्यानंतर मोहम्मदच्या एका मित्राने मुलांना चॉकलेट वाटले. त्यावेळी कुणीतरी फोटो काढून मुले पळवणारी टोळी असल्याची अफवा व्हॉटसअपवर पसरवली. त्यानंतर पुढच्या गावात मोहम्मदची जमावाने ठेचून हत्या केली होती. सुदैवाने यामध्ये मित्र मात्र बचावले होते.

धुळ्यातील राईनपाडामध्ये देखील मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून ५ जणांची ठेचून हत्या केली होती. राईनपाडामध्ये पाच जण बाजाराच्या ठिकाणी उतरले. त्यावेळी त्यातील एक जण मुलांशी बोलत होता. स्थानिकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्यांची राईनपाडाच्या ग्रामपंचायतीमध्ये ठेचून हत्या करण्यात आली.

महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, आसाम, उत्तरप्रदेशमध्ये सध्या अनेक जणांना अफवांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

 

वाचा – मुले पळवण्याच्या अफवेवरुन गुगलच्या इंजिनिअरची हत्या

वाचा – जमावाकडून मारहाणीनंतर पोलिसांनी देखील ‘त्याला’ मारले

वाचा – राजस्थानमध्ये जमावाने केली तरुणाची हत्या, गो-तस्करीचा होता संशय

वाचा – धुळे मारहाण प्रकरण; आणखी एक अटके

- Advertisment -