Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश केंद्र सरकारने कॅन्सर, डायबेटिस आणि टीबीवरील औषधांसह 39 औषधांचे दर केले कमी

केंद्र सरकारने कॅन्सर, डायबेटिस आणि टीबीवरील औषधांसह 39 औषधांचे दर केले कमी

डायबेटिस रुग्णांना देण्यात येणारी Teneligliptin आणि  टीबी विरोधी गोळ्यांचाही समावेश आहे.

Related Story

- Advertisement -

कर्करोग,मधुमेह,टीबी यासारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने कॅन्सर,डयबेटिस आणि टीबीवरील औषधांसह तब्बल 39 औषधांचे दर कमी केले आहे. एनएलएमच्या या संशोधनानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांवरील उपचार आता आणखी सोपा होणार आहे. यामध्ये कर्करोग विरोधी (anti-cancer), मधुमेह विरोधी (anti-diabetes), अँटीव्हायरल (antiviral), बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या ( antibacterial) आणि टीबी विरोधी ( anti-TB drugs) या गोळ्यांसह 39 गोळ्यांचा समावेश आहे आणि या गोळ्या कोरोना व्हायरसच्या उपचारा दरम्यान देखील वापरल्या जातात.(central government slashes prices of 39 common drugs)

केंद्र सरकार मागील 4 वर्षापासून गोळ्यांचे दर आटोक्यात आणण्याचे करत आहे. केंद्राने 2015 मध्ये आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी तयार केली. यानंतर पुढे स्थायी समितीवर हे काम सोपवण्यात आलं. यामध्ये रुग्णांना कोणती औषधे पुरेशा व आवश्यक प्रमाणात उपलब्ध असावीत याची वर्गवारी करण्यात आली.

- Advertisement -

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) गोळ्यांचे दर नियंत्रीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये एनएलएमच्या सूचीवर काम करणाऱ्या काही तज्ञांनी 16 Odd गेळ्या हटवल्या असून रुग्णांना दररोज आवश्यक असणाऱ्या गोळ्या-ओषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यासर्वामध्ये डायबेटिस रुग्णांना देण्यात येणारी Teneligliptin आणि  टीबी विरोधी गोळ्यांचाही समावेश आहे. या व्यतीरिक्त कोरोना व्हायरस दरम्यान रुग्णांना देण्यात येणाऱ्या Ivermectin आणि Rotavirus vaccine यांचाही समावेश आहे.


हे हि वाचा – CoronaVirus: लहान मुलांवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम; बरे झाल्यानंतर ७ महिन्यांपर्यंत लक्षण कायम

- Advertisement -