घरदेश-विदेशघ्या, जीएसटीच्या जाहिरातींवर १३२ कोटींचा खर्च!

घ्या, जीएसटीच्या जाहिरातींवर १३२ कोटींचा खर्च!

Subscribe

१ जुलै, २०१७ रोजी देशभरात जीएसटी लागू केल्यानंतर विविध स्तरातून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जीएसटीला मोठ्या प्रमाणात विरोधही झाला होता. हाच विरोध कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात अॅड कॅम्पेन केलं होतं. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार या जाहिरातींवर केंद्र सरकारने तब्बल १३२ कोटी खर्च केले आहेत.

देशभरात जीएसटीची चर्चा सुरू असतानाच आता जीएसटीविषयी सामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या जाहिरात मोहिमेची आकडेवारी आता समोर आली आहे. आणि त्यातून बाहेर आलेले आकडे हे डोळे फिरवणारे आहेत. १ जुलै २०१७ रोजी देशभरात जीएसटी लागू करण्यात आला. जीएसटी टॅक्स लागू होण्यापूर्वी आणि लागू झाल्यानंतर या टॅक्सबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात आली. या जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

अमिताभ बच्चन झाला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर

माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यामध्ये केंद्र सरकारने टीव्ही जाहिरातींवर ५ कोटींचा खर्च केला आहे. या जाहिरातींसाठी सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून सहभागी करून घेण्यात आले होते. या जाहिराती प्रामुख्याने जीएसटीला प्रमोट करणे आणि जीएसटीविषयी माहिती देणे यासाठी करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

७८ हजार कोटींचा महसूल वसूल

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार प्रिंट मीडिया अर्थात वर्तमानपत्रांमध्ये जीएसटीसंदर्भात छापून आलेल्या जाहिरातींवर केंद्र सरकारने आत्तापर्यंत १३२.३८ कोटींचा खर्च केला आहे. त्यामध्ये जीएसटी लागू झाला त्यादरम्यान वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पान छापून आलेल्या जाहिरातींचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरातली आकडेवारी पाहाता जीएसटीमधून केंद्र सरकारला ३६ हजार ९६३ कोटी तर राज्य सरकारला ४१ हजार १३६ कोटींचा महसूल मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -