घरताज्या घडामोडीदिवाळीनंतर अर्थमंत्र्यांकडून राज्यांना बोनस, केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला काय?

दिवाळीनंतर अर्थमंत्र्यांकडून राज्यांना बोनस, केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला काय?

Subscribe

कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव

नवी दिल्ली : दिवाळीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून राज्यांना बोनस दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशाची अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्यांच्या खात्यात एकत्रितपणे अधिक रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देण्यात आलाय. सर्व राज्यांना येत्या आठ दिवसांत केंद्राकडून ९५ हजार ८२ कोटी रूपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी. तसेच राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी, यासाठी केंद्राने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांना दोन हप्त्यांमधील रकमेचे एकत्र वाटप होणार आहे. केंद्रांना मिळाणाऱ्या एकूण महसूलापैकी ४१ टक्के हिस्सा हा राज्यांना वितरीत केला जातो. तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये ४७ हजार ५४१ कोटींचा हप्ता राज्यांना नियमाप्रमाणे दिला जाणार आहे. वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र सरकार राज्यांना विविध केंद्रीय करांमधून वर्षभरात १४ हप्त्यांच्या स्वरूपात देत. यामध्ये ११ हप्त्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला काय?

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता, राज्यात महागाईचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्येही भाववाढ झाली आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्याच्या वाट्याला काय?, असा प्रश्न येथे उपस्थित होतोय. उत्तर प्रदेशला केंद्र सरकारकडून १७ हजार ५६ कोटी रूपयांची रक्कम मिळणार आहे. तर पश्चिम बंगालला ७ हजार १५२ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. तसेच महाराष्ट्राला ६ हजार ६ कोटी रूपयांची रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.


हेही वाचा: दक्षिण मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही बिकट

- Advertisement -

कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव

काल सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची बैठक घेतली आहे. अर्थव्यवस्थेला योग्य दिशा मिळण्यासाठी सामायिक कृती योजना तयार करणे. हा या बैठकीचा उद्देश होता. परंतु आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे या बैठकीत देशभरातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इतर बँकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये निर्मला सीतारामण कशाबद्दल चर्चा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -