Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश केरळचे आता 'असे' होणार नामकरण, केंद्र सरकार करणार शिक्कामोर्तब

केरळचे आता ‘असे’ होणार नामकरण, केंद्र सरकार करणार शिक्कामोर्तब

Subscribe

मुख्यमंत्री विजयन यांनी केरळ राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता केरळ राज्याचे नाव हे लवकरच 'केरळम' होण्याची शक्यता आहे.

केरळ : मुख्यमंत्री विजयन यांनी केरळ राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता केरळ राज्याचे नाव हे लवकरच ‘केरळम’ होण्याची शक्यता आहे. परंतु आता या प्रस्तावावर अंतिम निर्णय हा केंद्र सरकारला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे जर का केंद्रात पण हा प्रस्ताव मंजूर झाला तर केरळ राज्याचे नाव बदलण्यात येईल. मल्याळम भाषेला केरळम असे बोलले जाते. त्यामुळे राज्याचे नाव देखील तेच ठेवण्यात यावे, असा युक्तीवाद सरकारकडून करण्यात आलेला आहे. (central government will take the final decision to change the name of Kerala)

हेही वाचा – No-Confidence Motion : एनडीएचे स्थान अधिक बळकट होणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

- Advertisement -

याबाबत बोलताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, आम्ही या सभागृहात नियम 118 अंतर्गत एक ठराव घेऊन आलो आहोत, यामध्ये राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची अंतर्गत सर्व भाषांमध्ये आमच्या राज्याचे नाव बदलून केरळम करावे, असे आवाहन केंद्राला केले आहे. 01 नोव्हेंबर 1956 रोजी भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली हे विसरता कामा नये. त्या तर्कानुसार केरळला मल्याळम भाषेत केरळ म्हणतात. तर हा प्रस्ताव केरळ विधानसभेत सादर केल्यानंतर याला विरोधकांकडून देखील पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे केरळ सरकारच्या या प्रस्तावावर केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच, मुख्यमंत्री विजयन यांनी केंद्र सरकारला विनंती करत म्हटले आहे की, ही विधानसभा एकमताने केंद्र सरकारला घटनेच्या कलम 3 अंतर्गत राज्याचे नाव बदलण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती करते. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव ‘केरळम’ असे ठेवावे. याआधी मंगळवारी केरळ विधानसभेत समान नागरी संहिता म्हणजेच यूसीसी लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेविरोधात ठराव मांडला होता. समान नागरी कायद्याबाबत बोलत असताना मुख्यमंत्री विजयन यांनी संघावर निशाणा साधला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -