मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांची केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत

केरळवासियांच्या मदतीला देश आणि जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. दरम्यान मध्य रेल्वेच्या हजारो कर्मचाऱ्यांनीही केरळला आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

kerala floods 2018
केरळमध्ये महाप्रलय

केरळच्या पूरग्रस्तांना संपूर्ण देशातून हजारो मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. त्यात आता मध्य रेल्वेनेही केरळवासियांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने केरळला सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यानुसार, केरळला लाखो लिटर्सचे ‘जलदूत’ पाठवण्यासह केरळला अन्न आणि आणखी सामुग्रीची विनामुल्य वाहतूक करण्यात येत आहे. त्यातच आता मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही आपल्या वेतनातून काही रक्कम केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे ९० हजार कर्मचारी असून त्यांच्या ऑगस्ट महिन्यातील वेतनातील काही रक्कम स्वच्छेने विविध ग्रेड प्रमाणे केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला या रकमेचा आकडा समजू शकेल असे म्हटले जात आहे.

मध्य रेल्वेने यापूर्वीच केरळला स्वच्छ पाण्याच्या १४ वॅगन पाठवल्या असून २७ हजार किलोचे मदत साहित्य मध्य रेल्वेहून सुटणार्‍या विविध ट्रेनद्वारे पाठवून दिले, असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यात आता मध्ये रेल्वेचे कर्मचारी ही या पूरग्रस्तांना त्यांच्या वेतनातून काही रक्कम पाठवणार आहे. केरळला आतापर्यंत अनेक राज्यातून आर्थिक मदत देण्यात आली आहे. शिवाय, महाराष्ट्राचे डॉक्टर्स केरळात जाऊन तिथल्या लोकांना आरोग्य सेवा देत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केरळवासियांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.

बेसिक पगारावर ठरणार मदत देण्याचा निकष

मध्य रेल्वेच्या ज्या कर्मचाऱ्यांना १८०० ते २००० च्या दरम्यान बेसिक पगार आहे, ते ५०० रुपयांपर्यंत देणगी गोळा करणार आहेत. तर, २४०० ते २८०० च्या मध्ये बेसिक पगार असलेले कर्मचारी ७०० रुपये देणगी देतील. ४२०० ते ४६०० च्या मध्ये असलेले प्रत्येकी हजार रुपये देणगी देतील. तर ४८०० ते ६६०० पर्यंत पगार असणारे १५०० रुपये देणगी देणार आहेत. जे ७६०० पर्यंत कमावतात ते २००० देणगी स्वरुपात दान करतील. तर, ज्यांना ८७०० ते १० हजारांदरम्यान पगार असेल ते २५०० पर्यंत दान करु शकतील आणि ज्यांना १० हजार पगार असेल ते ३००० हजार देणगी देतील. ऑगस्ट महिन्याचा पगार झाला की, ही मदत केली जाणार आहे.