घरदेश-विदेशरेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक

Subscribe

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचं शनिवारी निधन झालं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होत्या. शिवाय, माटुंगा मतदारसंघातून त्या विधानसभेवर देखील गेल्या होत्या.

पीयूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “आपल्या स्नेह व प्रेमाने मला नेहमी मार्ग दाखवणारी माझी आदरणीय आई आज सकाळी स्वर्गवासी झाली. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सेवा करत व्यतित केलं व आम्हाला देखील सेवाभावाने जीवन व्यतित करण्यासाठी प्रेरित केलं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणाशी स्थान देवो, ॐ शांती..” असं पीयूष गोयल यांनी ट्विट केलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, पूनम महाजन यांनीही ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -