घरताज्या घडामोडीCoronavirus Vaccination: ४५ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

Coronavirus Vaccination: ४५ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

Subscribe

देशभरात कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. त्यानंतर १ मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. या लसीकरण मोहीमेबाबत काल (मंगळवारी) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस घेण्यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच वैज्ञानिकांच्या सल्लानुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर चार ते आठ आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५ कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला. या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चला दुसऱ्या टप्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस देण्यात आली. त्यानंतर आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज आपण कोरोना लसीकरण करण्यासाठी नाव नोंदणी कशी करावी हे पाहणार आहोत? कोरोना लसीकरणासाठी आरोग्य सेतू (Aarogya Setu) App असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

लस घेण्यासाठी नाव नोंदण कसे करावे?

पहिल्यांदा आरोग्य सेतू App डाऊनलोड करा. काही जणांकडे हा App पहिल्यापासून डाऊनलोड असेल.

आरोग्य सेतू App ओपन केल्यानंतर कोविन (Cowin) आयकोन असेल तिथे क्लिक करा. हे कोविन आयकोन तुम्हाला आरोग्य सेतूमधील टॉप मेन्यूमध्ये दिसेल.

- Advertisement -

कोविन आयकोनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार पर्याय दिसतील. लसीकरण माहिती, लसीकरण (लॉगिंन/ नोंदणी), लसणीकरण प्रमाणपत्र आणि लसीकरण डॅशबोर्ड हे चार पर्याय दिसतील.

या चार पर्यायपैकी तुम्हाला दुसऱ्या पर्याय (लसीकरण (लॉगिंन/ नोंदणी) क्लिक करायचा.

नोंदणी करण्याच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर विचारला जाईल.

मोबाईलनंबर तिथे टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी (OTP one-time password) येईल. तो ओटीपी टाकून तुम्हाला पुढे जायचे आहे.

ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्हाला ओळखपत्राची माहिती द्यावी लागेल. उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस इत्यादी.

त्यानंतर तुमचे लिंग कोणते आहे हे विचारले जाईल आणि तुम्हाला जन्म तारीख विचारली जाईल.

तुमच्या ओळखपत्रावरील पत्त्यानुसार तुम्हाला कोरोना लसीकरण केंद्र मिळेल. तुम्ही तुमचा पिन कोड टाकून लसीकरण केंद्र निवडू शकता.

तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जर लसीकरणाची वेळ पाहिजे असेल ती तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ‘Check Availability’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

जर तुम्हाला हवी असलेली वेळ मिळत असेल तर तुम्ही प्रोसेडवर क्लिक करू शकता.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. मग तुम्हाला जर ते पटत असेल तर तुम्ही ‘Confirm Appointment’ क्लिक करू शकता.

तुम्ही तुमची लसीकरणाची तारीख शेड्यूल किंवा कॅन्सल करू शकता.

ज्यावेळेस तुम्ही लसीकरणासाठी जाल तेव्हा तुम्हाला एखादे ओळखपत्र केंद्रावर घेऊन जावे लागेल.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -