Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Centre-Delhi row : सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय, आपकडून स्वागत

Centre-Delhi row : सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय, आपकडून स्वागत

Subscribe

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाने (AAP) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रशंसा केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देखील, हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय असल्याचे सांगितले.

- Advertisement -

आम आदमी पार्टीने ट्वीट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचा अधिकार निवडून आलेल्या सरकारला असेल. याच सरकारच्या माध्यमातूनच अधिकारी काम करतील. तर, अधिकाऱ्यांमार्फत दिल्लीतील लोकांची कामे थांबवण्याचा अधिकार नायब राज्यपालांना (Lt Governor) नसेल, असे ट्वीटमध्ये लिहिले. केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला न्याय दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. विकासाचा वेग अनेक पटींनी वाढणार असल्याचे ते म्हणाले.

आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी या निकालाला, ऐतिहासिक निर्णय म्हटले आहे. हा दिल्लीचा विजय असून सत्यमेव जयते. दिल्लीतील सरकारी अधिकारी हे निवडून आलेल्या सरकारच्या माध्यमातून दिल्लीच्या जनतेची सेवा करण्यासाठी आहेत, प्रशासनात अडथळा आणण्यासाठी नाही, असा स्पष्ट संदेश या ऐतिहासिक निकालाद्वारे गेला आहे. नायब राज्यपालांचीही सर्वोच्च न्यायालयाने कोंडी केली आहे, असे राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आतिशी यांनीही हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला आपले अधिकार दिले आहेत. आता दिल्लीतील जनतेच्या कामात कोणीही अडथळा आणू शकणार नाही. हा दिल्लीच्या जनतेचा विजय असून आता दिल्ली दुप्पट वेगाने प्रगती करेल, असे आतिशी यांनी म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आठ वर्षे दिल्लीतील जनतेसाठी कायदेशीर लढा दिला आणि आज जनतेचा विजय झाला आहे, असे ट्वीट दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी केले आहे.

- Advertisment -