घरताज्या घडामोडीCorona Vaccine: देशात लसीकरणाला वेग येणार, भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन'चा फॉर्म्युला शेअरींगची तयारी

Corona Vaccine: देशात लसीकरणाला वेग येणार, भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’चा फॉर्म्युला शेअरींगची तयारी

Subscribe

कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी काही राज्यांकडून कोरोना लसीचे फॉर्म्युले दुसऱ्या लस निर्मिती कंपन्यांना देण्याची मागणी केली जात आहे. याच अनुषंगाने हैदराबाद स्थिती भारत बायोटेक कंपनीने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा फॉर्म्युला दुसऱ्या लस उत्पादक कंपनीसोबत शेअर करण्यासाठी तयार असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती नीति आयोगचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी १३ मेला एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. यासंदर्भात डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘भारत बायोटेक या प्रस्तावाचे स्वागत करत असून सरकारच्या या प्रयत्नात पूर्णपणे सहयोग करेल. तसेच यासाठी सर्व सक्षम आणि इच्छुक कंपन्यांना उघडपणे आमंत्रित केले आहे. ज्या कंपन्यांना ही लस तयार करायची आहे, त्यांना संयुक्तपणे काम करावे लागणार आहे.’

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘कोरोनाचे उत्पादन वाढवण्यासाठी दुसऱ्या उत्पादक कंपन्यांना लसीचा फार्म्युला दिला पाहिजे असे लोकांचे मत आहे. त्यामुळे ही गोष्ट सांगताना आम्हाला आनंद होत आहे की, कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादक भारत बायोटेकने या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.’

- Advertisement -

ही लस बनवण्याच्या प्रक्रियेत जिवंत व्हायरसला निष्क्रिय केले जाते आणि हे फक्त BSL3 लँबमध्ये केले जाते. परंतु सर्व कंपन्यांकडे अशा प्रकारची लँब नसते. त्यामुळे आम्ही फक्त सक्षमपणे लस तयार करणाऱ्या कंपन्यांना खुले आमंत्रण देत आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

जेव्हा काही राज्यांमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यासंदर्भातल्या गोष्टी समोर आल्या तेव्हा डॉ. वीके पॉल यांनी या प्रस्तावाबाबत सांगितले. एक दिवसापूर्वी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत लसीच्या फॉर्म्युला शेअरींगबाबत बातचित केली होती. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यामध्ये कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड तयार करण्याचा फॉर्म्युला देशातील दुसऱ्या लस निर्मात्या कंपन्यांना मिळाला पाहिजे. ज्यामुळे देशात लसीचे उत्पादक वेगात वाढले. यासाठी आपल्याला पेटेंट लॉ हटवायला पाहिजे, असे पत्रामध्ये नमूद केले होते. केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी अशाच पद्धतीने पंतप्रधान मोदी यांच्याकडून विनंती केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत कोरोना लस घेतलेल्या लोकांना विनामास्क फिरण्यास परवानगी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -