Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शिक्षण, नोकरी, टोकयो ऑलिम्पिक निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रवास करताय ? लसीकरणासंबंधी केंद्राकडून मार्गदर्शक...

शिक्षण, नोकरी, टोकयो ऑलिम्पिक निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रवास करताय ? लसीकरणासंबंधी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना कोरोना लसीकरणासाठी प्रमाणित मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी केली आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एसओपी अर्थात मार्गदर्शक सूचना जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या मते, केंद्र सरकारने शिक्षण, रोजगार आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी लसीकरणासंदर्भात एसओपी जारी केली आहे. यानुसार, अशा प्रवाशांच्या पासपोर्टशी कोव्हिन प्रमाणपत्रं जोडले जाणार आहे.

मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले की, पासपोर्टमध्ये कोव्हिन प्रमाणपत्राला जोडण्यासह लसीच्या प्रकारात ‘कोव्हशील्ड’ असा उल्लेख असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त लसीकरण प्रमाणपत्रात कोणत्याही माहितीची आवश्यकता राहणार नाही. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून शिक्षण, रोजगार किंवा टोकियो ऑलिम्पिकसाठी परदेशात जाणाऱ्या लोकांना ‘कोव्हशील्ड’चा दुसरा डोस आवश्यक असल्यास ८४ दिवस पूर्ण होण्यापूर्वी देण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने असे म्हटले की ज्यांनी कोव्हशील्ड’चा पहिला डोस घेतला आहे आणि त्यांच्या प्रवासाची तारीख दुसर्‍या डोससाठी निर्धारित ८४ दिवस पूर्ण होण्यापूर्वी होत आहे, त्यांना अगोदर डोस देण्यात यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लस आवश्यक

- Advertisement -

जगाच्या बर्‍याच देशांनी कोरोना लस न घेता लोकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत ज्यांना खेळासाठी किंवा अभ्यासासाठी आणि बेरोजगारासाठी जावे लागते, त्यांच्यासाठी कोव्हशील्डची लस घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत भारतात कोव्हशील्ड आणि स्वदेशी लस कोव्हॅक्सिनची लस दिली जात आहे. यामध्ये भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लस घेणाऱ्यांना परदेशात जाण्यात अडचणी येत आहेत. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये या लसीचा समावेश नाही. ज्यामुळे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांना इतर देशांत प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत.


दिलासा! लवकरच देशात स्पाइक प्रोटीनयुक्त असणारी स्वस्त Corona Vaccine मिळणार

- Advertisement -