घरताज्या घडामोडीकोरोना काळात गेली नोकरी? मोदी सरकार देणार तीन महिन्यांचा पगार

कोरोना काळात गेली नोकरी? मोदी सरकार देणार तीन महिन्यांचा पगार

Subscribe

कोरोनाच्या काळामध्ये अनेक व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेला. पण आता कोरोना काळात नोकरी गेलेल्या कर्मचारी राज्य विमा योजनेतील (employees state insurance corporation) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार नोकरी गेलेल्या या सदस्यांना तीन महिन्यांचा पगार देणार आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याबाबत सांगितले आहे. भूपेंद्र यादव म्हणाले की, कोरोना काळात जीव गमावलेल्या ईएसआय सदस्यांच्या नातेवाईकांना आजीवन आर्थिक मदत त्यांच्या मंत्रालयाकडून देण्यात येईल. मात्र कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी अजूनही याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही आहे.

- Advertisement -

लेबर कोडबाबत काय म्हणाले?

भूपेंद्र यादव म्हणाले की, प्रत्येक राज्यात लेबर कोड तयार करण्याचे काम सुरू आहे. माहितीनुसार, कामगारांसाठी संबंधित २९ कामगार कायद्यांना ४ कोडने बदलले आहे. हा लागू झाल्यानंतर कंपन्यांमध्ये कामासंबंधित नियमांमध्ये मोठा बदल होईल. १ ऑक्टोबरपासून हा कोड लागू होईल, असे म्हटले जात आहे.

ई-श्रम पोर्टलबाबत काय म्हणाले?

भूपेंद्र यादव म्हणाले की, ई-श्रम पोर्टलवर बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्ते विक्रेते आणि घरगुती कामगार अशा ३८ कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य सरकारचे आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहे. पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांना एक ई-श्रम कार्ड दिले जाईल. या कार्डमध्ये १२ अंकी यूनिक नंबर असतील, जे भविष्यात त्यांना सामजिक सुरक्षा योजनांमध्या सामील होण्यात मदत करेल.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना वाहिली श्रद्धांजली


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -