Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Covid-19: केंद्र देशव्यापी लॉकडाऊन लादण्याची शक्यता

Covid-19: केंद्र देशव्यापी लॉकडाऊन लादण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजनेसह कठोर निर्बंध लागू करण्यासह “customised lockdowns” लागू करण्याचा सल्ला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता काही राज्य कठोर निर्बंध आणि पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या तयारीत असून साधारण १० राज्यांनी कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी निर्बंध घातले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच १५ टक्क्यांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण असणाऱ्या साधारण १५० जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. तर मंत्रालयातील अधिकारी आणि कोविड -१९ टास्क फोर्सने कुंभ येथून परतणाऱ्या लोकांमुळे देखील कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. यासह शनिवारी देशात ३ लाख ९२ हजार नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये संपूर्ण देशातील १० राज्यांत साधारण ७३ टक्के रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. या १० राज्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

- Advertisement -

तसेच यापूर्वी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी AIIMS प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी असे सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली होती, तसा कडक लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनचे कठोर निर्बंधाचे निकष ठरविण्याबाबत वैद्यकीय पायाभूत सुविधा राज्यांत वाढविण्यासाठी तातडीने केंद्राने भर दिला आहे. त्याशिवाय प्रोटोकॉलनुसार हॉटेल, स्टेडियम इत्यादींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे देखील सुचविले आहे.

- Advertisement -