घरअर्थजगतएका झूम कॉलवर 900 जणांना नोकरीवरून काढणारे विशाल गर्ग पुन्हा सेवेत परतले

एका झूम कॉलवर 900 जणांना नोकरीवरून काढणारे विशाल गर्ग पुन्हा सेवेत परतले

Subscribe

भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांनी झूम कॉल मीटिंगदरम्यान 900 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती.

नवी दिल्ली : विशाल गर्ग हे नाव आठवतंय का? जरा डोक्याला ताण दिला तर लक्षात येईल की, या व्यक्तीने एकाच वेळी 900 लोकांना आपल्या कंपनीतून काढून टाकले होते. तेही फक्त एका झूम कॉलवर. होय, अगदी तीच ही व्यक्ती आहे, ज्याच्या निर्णयाचा जगभरातून निषेध झाला. विशेष म्हणजे तो Better.com वर परत आलाय आणि कंपनीच्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेतल्याचे वृत्त आहे. झूम कॉलवर 900 लोकांना काढून टाकल्यानंतर कंपनीच्या बोर्डाने विशाल गर्गला दीर्घ रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून विशाल रजेवर होता.

भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांनी झूम कॉल मीटिंगदरम्यान 900 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती.

- Advertisement -

विशालने माफीही मागितली होती

कंपनीने मेलद्वारे सांगितले होते की, बेटरचे सीईओ विशाल गर्ग दीर्घ रजेवर जात आहेत. सीईओ म्हणून ते पुन्हा परततील, असे सांगण्यात आले होते. आमचा विशालवर विश्वास आहे. 2016 मध्ये जेव्हा Better.com ची स्थापना करणाऱ्या विशाल गर्गने झूम कॉलद्वारे 900 लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली, तेव्हा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी माफी मागितली.

नोकरकपातीसाठी लॉकडाऊनचे दिले कारण

दरम्यान, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी केविन रायन हे कंपनीच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करत होते आणि बोर्डाला अहवाल देत होते. त्याचवेळी गर्ग म्हणाले होते की, बाजारातील कामगिरी आणि उत्पादकतेमुळे अमेरिका आणि भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे लागतंय. 1 डिसेंबरला गर्गने झूम व्हिडीओ कॉलदरम्यान एका क्षणात 900 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. ही बैठक केवळ 3 मिनिटे चालली. गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, जर तुम्ही या बैठकीत सहभागी असाल तर तुमच्यासाठी दुःखद बातमी आहे. तुम्ही अशा समूहाचा भाग आहात, ज्याला कंपनीतून बाहेर काढले जात आहे. गर्ग हे वन झिरो कॅपिटल या गुंतवणूक होल्डिंग कंपनीचे संस्थापक भागीदार आहेत.

- Advertisement -

हेही वाचाः अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण अखेर सापडला; अपहरणनाट्याचा सूत्रधार कोण?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -