घरदेश-विदेशजर्मनी कंपनींच्या सीईओंना भारताच्या प्रगतीचं कौतुक, तरुणांच्या कौशल्याला वाव मिळणार?

जर्मनी कंपनींच्या सीईओंना भारताच्या प्रगतीचं कौतुक, तरुणांच्या कौशल्याला वाव मिळणार?

Subscribe

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत (Make in India Campaign) जर्मन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) बैठक घेतली. या बैठकीत जर्मन कंपन्यांसाठी भारतात शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर, टीयूव्ही नॉर्डच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डर्क स्टेनकॅम्प म्हणाले की, वाढत्या आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. भारत आज अशा टप्प्यावर आहे जिथून हा देश आर्थिक विकासाचे नवे उड्डाण घेऊ शकतो.

स्टीनकॅम्प म्हणाले की, ‘मेक इन इंडिया उपक्रमाबद्दल मला सुरुवातीपासूनच माहिती आहे आणि आम्ही अनेक जर्मन कंपन्यांना भारतात येऊन उत्पादन सुरू करण्यासाठी पाठिंबा देत आहोत. मेक इन इंडियाचा भाग होण्यासाठी भारतासाठी जर्मन मिटेलस्टँडमध्ये एक उपक्रम सुरू आहे. यासोबतच अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या जर्मन उद्योगांनी भारतात येऊन मेक इन इंडियाचा भाग व्हावे यासाठी एक उपक्रमही सुरू आहे. भारतात व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी प्रचंड क्षमता असल्याचे ते म्हणाले. स्टीनकॅम्प व्यतिरिक्त आणखी तीन कंपन्यांच्या शिष्टमंडळांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत भाग घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – भगतसिंगांचं नाव घेत मनीष सिसोदिया सीबीआय चौकशीला हजर; म्हणाले, तुरुंगात जावं…

रेथमन कंपनीचे सीईओ क्लेमेन्स रेथमन म्हणाले की, भारतात कौशल्य आणि प्रतिभा आहे. या साधनसंपत्तीचा सदुपयोग करून भारत उत्पादनात जगात मोठा होईल. इथे उद्योगासाठी वर्कफोर्स मिळतात. तर जर्मनीमध्ये कामगारांची कमतरता आहे. तुमच्याकडे अनेक हुशार तरुण आहेत ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे. तर रेंकच्या सीईओ सुझैन वेगंड यांनी सांगितले की, भारत सरकारचा विश्वासू भागीदार म्हणून येथे आल्याचा मला अभिमान आहे. त्यांची कंपनी भारतीय लष्कर आणि नौदलाला ड्राईव्ह सोल्यूशन्स पुरवत आहे. ते म्हणाले की, भारताची झपाट्याने वाढणारी सिमेंट बाजारपेठ ही देखील एक व्यावसायिक शक्यता आहे.

- Advertisement -

सॉफ्टवेअर कंपनी SAP चे CEO क्रिस्टियन क्लेन हे देखील पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत सामील होते. बैठकीनंतर ते म्हणाले की, भारताला आर्थिक स्थैर्यासाठी मोठ्या आकांक्षा आहेत. भारताला कार्बनचा वापर कमी करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने चालते. भारताचा भागीदार झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -