घरCORONA UPDATEगर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लस लवकर होणार उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

गर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लस लवकर होणार उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Subscribe

गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली स्वदेशी लस येत्या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरमचे प्रमुख अदार पूनावाला यांनी गुरुवारी या लसीच्या किंमतीसह अनेक गोष्टींबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कर्करोगासारख्या घातक आजारावर लस उबलब्ध होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief executive officer) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत भारत सरकारशी चर्चा करुन ठरवली जाईल, परंतु ही लस 200 ते 400 रुपये इतकी असू शकेल. गुरुवारी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनीही या लसीच्या वैज्ञानिक पूर्ततेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. वैज्ञानिक पूर्णत्वाचा अर्थ असा आहे की, लसीशी संबंधित संशोधन आणि विकास पूर्ण झाला आहे आणि ही लस लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहे. ही लस प्रथम आपल्या देशाला देण्यात येणार आहे. त्यानंतर जगातील इतर देशांना देण्यात येणार आहे, तसेच या लसीचे 2 वर्षांत 200 दशलक्ष डोस तयार करण्याची तयारी असल्याचेही पुनावाला यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सुत्रांच्या माहितीनुसार, गर्भाशय कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी ही लस 9 ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाऊ शकते. सुरुवातीला ही लस फक्त मुलींनाच दिली जाईल. स्वदेशी बनावटीची पहिली क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमावायरस वॅक्सीन (qHPV) गुरुवारी म्हणजेच आज लाँच होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाने 1 सप्टेंबर रोजी गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारासाठी स्वदेशी लस विकसित करण्याची योजना आखली होती. विशेष म्हणजे सीरम इन्स्टिट्यूटच्या HPV लसीला DCGI कडून 12 जुलै रोजी मार्केट ऑथरायझेशन मिळालं होतं.

सध्या या आजारावर प्रभावी लस भारत परदेशातून आयात करतो. बाजारात HPV लसीची किंमत सुमारे 2,000 ते 3,000 रुपये प्रति डोस आहे. सीरमने या सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यामुळे किमती कमी होतील अशी आशा आहे. सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करणे हे महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.


आबूधाबीत उभं राहतंय हिंदू मंदिर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली भेट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -