Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी पाक लष्करात उडाली खळबळ; CGS अब्बासनंतर आता माजी ISI प्रमुखांनी केली निवृत्तीची मागणी

पाक लष्करात उडाली खळबळ; CGS अब्बासनंतर आता माजी ISI प्रमुखांनी केली निवृत्तीची मागणी

Subscribe

पाकिस्तानला आज लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्या रूपाने नवा लष्करप्रमुख मिळणार आहे. परंतु ते लष्कर प्रमुख बनताच पाक लष्करात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) चे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांनी मुनीर प्रमुख होताच लष्करातून लवकर निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बहावलपूरचे कॉर्प्स कमांडर म्हणून कार्यरत असलेले जनरल हमीद हे पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. लष्करप्रमुख पदासाठी नामांकन झालेल्या सहा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांना तात्काळ निवृत्तीची विनंती रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयात करण्यात आली आहे.

लष्करप्रमुखपदाचे होते दावेदार

- Advertisement -

असीम मुनीर यांची नवे लष्करप्रमुख आणि जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर तात्काळ निवृत्ती घेण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ (CGS) लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास यांनीही तात्काळ निवृत्तीची मागणी केली आहे. ते सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही आहेत आणि लष्करप्रमुखपदाच्या दावेदारांमध्येही त्यांचे नाव होते.

लष्करप्रमुख न झाल्यामुळे अझहर अब्बासही संतापले

- Advertisement -

दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्वासाठी ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल अझर अब्बास यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार तात्काळ निवृत्ती घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ते नवीन लष्करप्रमुख होतील याची त्यांना पूर्ण खात्री होती, परंतु त्यांचे नाव वगळण्यात आल्याने ते खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे.

जनरल अब्बास यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, पाकिस्तान मिलिटरी अकादमीतून पास आऊट झाल्यानंतर 1987 मध्ये त्यांना 41 बलुच रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले होते. सध्या ते जनरल स्टाफचे प्रमुख आहेत. त्यांचे सध्याचे पद सीजीएसचे आहे.


हेही वाचा : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं टेन्शन वाढलं, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -