घरदेश-विदेशउद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा राम मंदिराचा प्रश्न विचारा - संजय राऊत

उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा राम मंदिराचा प्रश्न विचारा – संजय राऊत

Subscribe

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या म्हणजे २४ नोव्हेंबर पासून अयोध्या दौरा सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी आज अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार म्हणून राम मंदिराबाबतचे प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारले जात आहेत. मात्र राम मंदिर बांधायचे हे मोदी किंवा योगींना विचारा, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा राम मंदिराच्या प्रश्नावर उत्तर देतील, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

सभा घेणारच नव्हतो

उत्तर प्रदेश सरकारने शिवसेनेच्या सभेला परवानगी दिली नाही, त्यामुळे शिवसेना सभा घेणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “आम्ही कधीच सभेसाठी परवानगी मागितलीच नव्हती.” त्यामुळे सभा घेण्यााच प्रश्नच उरत नाही. या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे शरयू नदीच्या तीरावर आरती करणार आहेत आणि येथील लोकांशी संवाद साधणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -