घरदेश-विदेशChampai Soren Government Floor Test : झारखंडच्या राजकारणासाठी आजचा दिवस मोठा; चंपाई...

Champai Soren Government Floor Test : झारखंडच्या राजकारणासाठी आजचा दिवस मोठा; चंपाई सोरेन सरकारची अग्निपरीक्षा

Subscribe

चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज चंपाई सोरेनचे सरकार बहुमत चाचणीचा सामना करणार आहे.

राची : झारखंडच्या राजकारणासाठी आजचा दिवस मोठा आहे. चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण आज चंपाई सोरेन यांना बहुमताच्या चाचणीचा सामना करावा लागणार आहे. या बहुमताच्या चाचणीवर चंपाई सोरेनच्या सरकारचे भविष्य ठरणार आहे. या बहुमताच्या चाचणीसाठी हैदराबादमध्ये पाठविलेले आमदार राचीमध्ये दाखल झाले आहेत. या झारखंड सरकारच्या बहुमत चाचणीकडे चंपाई सोरेन नाही, तर विरोधकांचे देखील लक्ष लागले आहे. त्यामुळे आजचा दिवस हा झारखंडसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

यापूर्वी जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केले आहे. 31 जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज चंपाई सोरेनचे सरकार बहुमत चाचणीचा सामना करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Khadse Vs Mahajan : ‘या’ कारणामुळे एकनाथ खडसेंच्या मालमत्तेचा होऊ शकतो लिलाव; गिरीश महाजनांची माहिती

सत्ताधारीकडे एवढे आहे संख्याबळ

झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहे. झारखंड मुक्ती मोर्चा 29 , काँग्रेस 17, आरजेडी 1 आणि सीपीआय 1 असे एकूण 48 आमदारांचे पाठबळ आहे. झारखंडमध्ये बहुमतासाठी 41 एवढा संख्याबळाची गरज आहे. तसेच एनडीएकडे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.

- Advertisement -

कोण आहे चंपई सोरेन?

चंपई सोरेन हे सरायकेला मतदारसंघाचे आमदार असून सध्या ते परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री होते. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. चंपई सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पण हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर चंपई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -