घरदेश-विदेशJharkhand CM : चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; बहुमत सिद्ध करण्यासाठी मागितला 10 दिवसांचा वेळ

Jharkhand CM : चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; बहुमत सिद्ध करण्यासाठी मागितला 10 दिवसांचा वेळ

Subscribe

चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

राची : आज झारखंडेचे मुख्यमंत्री म्हणून चंपाई सोरेन यांनी शपथ घेतली आहे. चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केले आहे. ईडीने अटक करण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर चंपाई सोरेन यांनी आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

चंपाई सोरेन यांच्यासोबत काँग्रेसचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज झारखंडेचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याचबरोबर चंपाई सोरेन यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांनी युती करत झारखंडमध्ये सरकार स्थापन केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

सत्ताधारीकडे एवढे आहे संख्याबळ

झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहे. झारखंड मुक्ती मोर्चा 29 आमदार, काँग्रेस 17 आमदार, आरजेडी 1 आणि सीपीआय 1 असे एकूण 48 आमदार आमदारांचे पाठबळ आहे. झारखंडमध्ये बहुमतासाठी 41 एवढा संख्याबळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जोपर्यंत झारखंडमध्ये बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत सर्व आमदारांना हैदराबादच्या हॉटेलमध्ये पाठविले आहे. तसेच विरोधकांकडे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.

कोण आहे चंपई सोरेन?

चंपई सोरेन हे सरायकेला मतदारसंघाचे आमदार असून सध्या ते परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री होते. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. चंपई सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पण हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर चंपई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -