‘या’ राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट

Unseasonal Rain

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असली तरी तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील पाच दिवस वेगवेगळ्या राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे उष्णतेचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये १६ ते १९ मार्चदरम्यान पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याशिवाय ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व भारतात 16 ते 20, पश्चिम हिमाचल आसपासच्या परिसरात 17-19 मार्च दरम्यान पाऊस आणि वादळाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, देशातील बहुतांश भागात कमाल तापमान 35-38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज 30-34 अंश सेल्सिअस होते, तर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमान 25-29 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे.

या राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता
16 ते 19 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पाऊस आणि गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याशिवाय 17-19 मार्च दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
16-17 मार्चला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, 17 ​​मार्चला हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय, 17-19 मार्च या कालावधीत पूर्व राजस्थानमध्ये पावसाची शक्यता आहे.
पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यांबद्दल बोलायचे झाल्यास गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड येथे १६ ते १९ मार्च दरम्यान मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहतील. याशिवाय, 16 ते 19 मार्च दरम्यान तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
पूर्व आणि ईशान्य भारताबद्दल सांगताना हवामान खात्याने सांगितले की, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये १५ मार्च दरम्यान पाऊस पडेल. त्याचबरोबर बिहार-झारखंडमध्ये १७ मार्चला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना इशारा
हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला असून हवामानातील घडामोडींमुळे शेतकऱ्यांना उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात मोहरी, हरभरा आणि भाजीपाला पिकवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील गहू, मोहरी, कडधान्ये आणि महाराष्ट्रातील गहू, कडधान्ये, द्राक्षे त्वरित सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याचे आवाहन केले आहे. या व्यतिरिक्त, केळीच्या घडांना बांबूच्या काड्यासह आधार द्या आणि नवीन लागवड केलेल्या भाज्यांना आधार देण्याचे आवाहन केले आहे. मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत हवामान खात्याने द्राक्षांच्या घडांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी स्कर्टिंग बॅग किंवा अॅल्युमिनियम कोटेड पेपर वापरण्यास सांगितले आहे.