घरदेश-विदेशChandigarh Mayor : देशात प्रथमच महापौर निवडणुकीत न्यायालयाचा हस्तक्षेप; 'आप'चे कुलदीप चंदीगडचे नवे महापौर

Chandigarh Mayor : देशात प्रथमच महापौर निवडणुकीत न्यायालयाचा हस्तक्षेप; ‘आप’चे कुलदीप चंदीगडचे नवे महापौर

Subscribe

चंदीगड महापालिकेच्या महापौर पदासाठी 30 जानेवारीला मतदान झाले होते.

चंदीगड : चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविलेली 8 मते वैध ठरवण्यात आली असून पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते. यानुसार आपचे कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरव्यवहारावर खटल्यासमोर 5 फेब्रुवारी रोजी सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीशांनी पीठासीन अधिकाऱ्यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला होता. यात पीठासीन अधिकारीच मतांसोबत गडबड करत असल्याचे दिसून येत आहेत. या प्रकरणी चंद्रचूड हे संताप व्यक्त केला होता. 31 जानेवारीला चंदीगडमध्ये महापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बहुमत नसतानाही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाच्या बाजूने निकाल दिला. ज्यानंतर विरोधकांनी म्हणजेच काँग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी या निवडणुकीवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले गेले. भाजपाने गैरव्यवहार करून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केला. ज्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chandigarh Mayor Poll Case : भाजपाला दणका, चंदिगडमध्ये ‘आप’चा महापौर!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच आपचे नेहा मुसावत, गुरचरण काला आणि पूनम देवी या तीन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आता चंदीगड महापालिकेचे महापौर पद भाजपाच्या पदरी पडण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण आज सर्वोच्च न्यायालयच्या निकालानंतर आप-काँग्रेसचा कुलदीप कुमार महापौर पदी विराजमान झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Chandigarh : चंदीगडच्या महापौरांचा राजीनामा; ‘आप’च्या 3 नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी पूर्वीच भाजपाचे नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. चंदीगड महापालिकेच्या महापौर पदासाठी 30 जानेवारीला मतदान झाले होते. यात काँग्रेस-आपला 12 मते मिळाली होते तर भाजपाला 16 मते मिळाली होती. काँग्रेस-आप 20 पैकी 8 मते अवैध ठरवल्यामुळे भाजपाचा विजय झाला होता. आप-काँग्रेसचे उमेदवार कुलदीप कुमार सिंग यांचा परभाव केला होता. यानंतर भाजपाच्या मनोज कुमार सोनकर यांनी महापौर पदी विराजमान झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -