घरदेश-विदेशChandigarh : चंदीगड महापौरपद निवडणुकीत 'इंडिया'ला झटका; केजरीवाल भाजपवर संतापले

Chandigarh : चंदीगड महापौरपद निवडणुकीत ‘इंडिया’ला झटका; केजरीवाल भाजपवर संतापले

Subscribe

चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार मनोज सोनकर यांना 16 मते, तर इंडियाला 12 मते पडली. यात 8 मते ही बाद झाल्याने भाजपाचा विजय झाला.

चंदीगड : चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. यानंतर भाजपाचे मनोज सोनकर हे चंदीगडच्या महापौर पदी विराजमान झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर चंदीगडच्या महापालिकेमध्ये गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर ट्वीट करत टीका केली आहे. “चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, तर देशातील निवडणुकीत ते कोणतीही पातळी गाठू शकतात”, अशी चिंता अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळावर अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त करणारे ट्वीट केले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, “चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिवसाढवळ्या ज्या पद्धतीने बेईमानी केली गेली, ते अत्यंत चिंताजनक आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत हे लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, ततर देशातील निवडणुकीत ते कोणतीही पातळी गाठू शकतात. हे खूप चिंताजनक आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP: भाजपा असेतो वेगळा विदर्भ शक्य नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

- Advertisement -

महापौर निवडणुकीचा ‘आप’चा असा झाला पराभव

चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून मनोज सोनकर विजयी झाले आणि आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पहिल्यांदाच इंडिया केली होती. यात निवडणुकीत भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार मनोज सोनकर यांना 16 मते, तर इंडियाला 12 मते पडली. यात 8 मते ही बाद झाल्याने भाजपाचा विजय झाला.

हेही वाचा – Bachchu Kadu :’त्यांनी बोलवले म्हणून मी सत्तेत’; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

या निकालानंतर चंदीगडच्या महापालिकेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. कारण 8 नगरसेवकांची मते ही जाणीवपूर्वक बाद करत भाजपाला मदत केली आहे, असा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. तर भाजपाने षडयंत्र केल्याचेही आपने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -