घरदेश-विदेशChandigarh Mayor Election : ही लोकशाहीची हत्या...; महापौर निवडणुकीवरील सुनावणीत रिटर्निंग अधिकाऱ्यावर...

Chandigarh Mayor Election : ही लोकशाहीची हत्या…; महापौर निवडणुकीवरील सुनावणीत रिटर्निंग अधिकाऱ्यावर CJI भडकले

Subscribe

सरन्यायाधीशांनी पीठासीन कार्यालयाचा व्हिडिओही पाहिला ज्यामध्ये एक अधिकारी मतं रद्द करत आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

चंदीगड: चंदीगड महापौर निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी केली. सरन्यायाधीशांनी पीठासीन कार्यालयाचा व्हिडिओही पाहिला ज्यामध्ये एक अधिकारी मतं रद्द करत आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. जे घडलं आहे त्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही लोकशाहीची अशाप्रकारे हत्या होऊ देऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले. CJI चंद्रचूड यांनी निवडणुकीचा संपूर्ण व्हिडिओ सादर करण्यास सांगितले आहे आणि नोटीसही जारी केली आहे. (Chandigarh Mayor Election This is the murder of democracy CJI lashed out at returning officer in hearing on mayoral election)

चंदीगड महापौर निवडणुकीला आव्हान देणाऱ्या कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे सर्व कागदपत्रे आणि सर्व व्हिडिओ पुराव्यांसह संपूर्ण रेकॉर्ड संध्याकाळी ठेवला जाईल.

- Advertisement -

CJI यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले, “आम्ही निर्देश देतो की महापौर चंदीगड महानगरपालिका निवडणुकीचे संपूर्ण रेकॉर्ड उच्च न्यायालयाने जप्त करावे आणि मतपत्रिका, व्हिडिओग्राफीदेखील जपून ठेवावी. नोंदी सुपूर्द करण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरला नोटीस बजावण्यात आली आहे.

निवडणुकीत नेमकं घडलं काय? 

चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. यात भाजपाचे उमेदवार मनोजकुमार सोनकर यांचा विजय झाला आहे. इंडिया आघाडीची ही पहिलीच निवडणूक होती. या पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. भाजपाच्या मनोजकुमार सोनकर यांनी आप-काँग्रेस संयुक्त उमेदवार कुलदीप सिंग यांचा पराभव केला.

- Advertisement -

चंदीगडच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर, विरोधकांनी भाजपावर आरोप केले आहेत. भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक पीठासीन अधिकाऱ्याची मदत घेतल्याचं विरोधकांनी म्हटलं.  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत, भाजपाने लोकशाहीचा गळा आवळला असल्याचं म्हटलं होतं. भाजपाने निवडणूक पीठासीन अधिकाऱ्याची मदत घेत, विरोधी उमेदवाराची मत बाद ठरवली, असा आरोप आव्हाडांनी केला होता.

(हेही वाचा: Jharkhand Floor Test : चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; बहुमत चाचणी जिंकली )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -