घरदेश-विदेशChandigarh : विनोद तावडेंनी आणखी एक मोहिम केली फत्ते; चंदीगड महापौर निवडणुकीनंतर...

Chandigarh : विनोद तावडेंनी आणखी एक मोहिम केली फत्ते; चंदीगड महापौर निवडणुकीनंतर राज्यसभेची चर्चा रंगली

Subscribe

आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला. यात भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार मनोज सोनकर यांना 16 मते, तर इंडियाला 12 मते पडली. यात 8 मते ही बाद झाल्याने भाजपाचा विजय झाला.

चंदीगड : चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाची आज निवडणूक झाली. यात निवडणुकीत भाजपा यश मिळाले आहे. भाजपाचे मनोज सोनकर हे चंदीगडच्या महापौर पदी विराजमान झाले आहेत. भाजपाकडे हा विजय खेचून आणण्यात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा सिंहाचा वाटा आहे. नुकतेच बिहारमध्ये सत्तांतर घडवल्यानंतर विनोद तावडे हे चंदीगडमध्ये विजयी पताका कायम ठेवली. यामुळे राज्यसभा निवडणुकीत विनोद तावडे यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

दरवर्षी चंदीगड महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आप यांनी इंडिया केली होती. या निवडणुकीतील पराभवामुळे इंडिलाला मोठा धक्का बसला जातो. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला. यात भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार मनोज सोनकर यांना 16 मते, तर इंडियाला 12 मते पडली. यात 8 मते ही बाद झाल्याने भाजपाचा विजय झाला.

- Advertisement -

हेही वाचा – Chandigarh : चंदीगड महापौरपद निवडणुकीत ‘इंडिया’ला झटका; केजरीवाल भाजपवर संतापले

लोकसभा निवडणुकीसाठी काही करू शकतात

या निवडणुकीच्या निकालानंतर गदारोळ झाला. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, “चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिवसाढवळ्या ज्या पद्धतीने बेईमानी केली गेली, ते अत्यंत चिंताजनक आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत हे लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, तर देशातील निवडणुकीत ते कोणतीही पातळी गाठू शकतात. हे खूप चिंताजनक आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -