घरदेश-विदेशनायडू - ममता बॅनर्जी यांची भेट निश्चित

नायडू – ममता बॅनर्जी यांची भेट निश्चित

Subscribe

ममता बॅनर्जी आणि चंद्रबाबु नायडू यांची भेट होणार आहे. या भेटीमध्ये भाजपविरोधातील राजकीय चालींवर चर्चा होणार आहे.

भाजप विरोधात आता चंद्रबाबु नायडू आणि ममता बॅनर्जी यांनी आघाडी उघडली आहे. भाजपविरोधात रणनिती ठरवण्यासाठी ममता बॅनर्जी आणि चंद्रबाबु नायडू या दोघांमध्ये आता भेट होणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी ही मीटींग होणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता दिल्लीमध्ये विरोधकांची मीटींग होणार आहे. त्यासाठी आता ममता बॅनर्जी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबु नायडू यांना देखील आमंत्रण दिलं आहे. या मीटींगमध्ये भाजपविरोधात रणनितीवर चर्चा होणार आहे. विरोधकांच्या या मीटींगमध्ये देशातील प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. चंद्रबाबु नायडू हे भाजपच्या मित्रपक्षांपैकी एक होते. पण, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा केंद्र सरकारनं न दिल्यानं नाराज झालेल्या चंद्रबाबु नायडूंनी भाजपची साथ सोडली होती. शिवाय, पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव देखील मांडला होता. भाजपच्या मित्रपक्षाची साथ मिळत असल्यानं आता विरोधकांना देखील बळ मिळालं आहे.

यापूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबु नायडू यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवाय मुलायमसिंह यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला, डीएमकेचे प्रमुख एम . के. स्टॅलिन, तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची देखील त्यांनी यापूर्वी भेट घेतलेली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशात सीबीआयला दोन्ही राज्यांनी बंदी घातली आहे. त्यानंतर केवळ तीन दिवसातच दोघांच्या भेटीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोदी सरकार सीबीआयचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी आणि चंद्रबाबु नायडू यांनी केला आहे. सध्या देशभरातील विरोधक भाजपविरोधात एकत्र आले असून लोकसभा २०१९मध्ये भाजपला पराभूत करायची यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमिवर होणारी ममता आणि चंद्रबाबु नायडू यांची भेट ही महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -