भाजपचं सरकार असल्याने आपल्या कार्यकर्त्याला सहज नोकरी मिळेल – चंद्रकांत पाटील

C R Patil

गुजरातमध्ये सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी रस्त्यावर आलेले पहायला मिळत आहेत. या दरम्यान, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोजगारासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपचं सरकार असल्याने आपल्या कार्यकर्त्याला सहज नोकरी मिळेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की, भाजप कार्यकर्त्याच्या मुलाला सहज नोकरी मिळते, पण तो भाजप कार्यकर्ता असणे आवश्यक आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशने भाजपला लक्ष्य केलं आहे. गुजरात सरकार भाजपची कंपनी आहे का? जेथे भाजप कार्यकर्ता असणे ही उमेदवाराची पात्रता मानली जाते, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान सांगितले की, आमच्याकडे जिल्हा प्रभारीने एका व्यक्तीला सकाळी थंडीत बाहेर जाण्याऱ्या व्यक्तीला थांबवले आणि त्याला एवढ्या थंडीत कुठे जात आहे, असं विचारलं. यानंतर प्रभारीने माझ्याकडे घेऊन आला. त्या व्यक्तीने मला गेली २० वर्ष भाजपसाठी काम करत असल्याचं सांगितलं. त्याने सांगितले की एक काम आहे मी सांगू की नको? द्विधा मनस्थितीत आहे. त्यावेळी त्याला बिनधास्त बोल म्हणालो. तेव्हा त्याने माझ्या भावाला नोकरी मिळत नाही, असं सांगितलं. यानंतरच त्याच्या मुलाला नोकरी मिळाली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.