घरदेश-विदेश'चांद्रयान-२' यशस्वीपणे अवकाशात झेपावलं

‘चांद्रयान-२’ यशस्वीपणे अवकाशात झेपावलं

Subscribe

‘चांद्रयान-२’ हे यान दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात झेपावले आहे. ‘चांद्रयान-२’ हे भारतीय वैज्ञानिकांचे फार मोठे स्वप्न आहे. या महत्त्वकांशी प्रकल्पातून भारताला चंद्राची तंतोतंत माहिती मिळणार आहे. याशिवाय चंद्राच्या दक्षिण भागात जावून संशोदन करणार भारत हा पहिला देश ठरणार आहे. त्यामुळे या यानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलेले होते. श्रीहरिकोटा येथील धवन अंतरिक्ष केंद्रातून जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क 3 या रॉकेटच्या मदतीने या यानाने यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. चांद्रयान-२ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. इस्त्रोने १० हजार लोक बसू शकतील अशी गॅलरी बनवली होती.

चंद्रावर उतरण्यासाठी ४८ दिवस लागणार

‘चांद्रयान-२’चे यशस्वीपणे प्रक्षेपण झाल्यानंतर ४८ दिवसांनी हे यान चंद्रावर पोहोचणार आहे. हे यान आता ६ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. सुरुवातीला हे यान काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत यान प्रवेश करुन काही दिवस त्या कक्षेत फिरणार आहे. तेथील वातावरणाचा आढावा गेत चंद्राच्या दक्षिण भागांत यान लॅण्ड होणार आहे.

- Advertisement -

इस्त्रो वैज्ञानिकांमध्ये आनंद

‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणानंतर इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी हे प्रक्षेपण इस्त्रोच्या टीमचे फळ आहे, असे इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -