Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3 : मिशन वेळापत्रकानुसार; ISRO ने व्हिडीओ ट्वीट करत दिली माहिती

Chandrayaan-3 : मिशन वेळापत्रकानुसार; ISRO ने व्हिडीओ ट्वीट करत दिली माहिती

Subscribe

Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचं लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे इस्रोने म्हटले आहे. तसेच उद्या लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास काही अडथळा आल्यास पुढील प्रक्रिया काय असणार याबाबतही इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांनी माहिती देण्यात आली होती. मात्र इस्त्रोने ट्वीट करत मिशन वेळापत्रकानुसार होणार असून यंत्रणांची नियमित तपासणी सुरू असल्याचे म्हटले आहे. (Chandrayaan 3 As per mission schedule ISRO gave the information by tweeting a video)

हेही वाचा – COVID लसीकरणाचा नेमका परिणाम काय? वाचा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चची माहिती…

- Advertisement -

इस्रोच्या अहमदाबाद स्थित Space application सेंटरचे संचालक नीलेश एम देसाई यांनी सांगितले की, चांद्रयान-3 मिशन 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यापूर्वी 2 तास आधी लँडर उतरवायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यांनी सांगितले की, चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवण्यापूर्वी त्याच्या मॉड्यूलचे आरोग्य, टेलीमेट्री डेटा आणि त्यावेळी चंद्राची स्थिती यावर आधारित निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. मात्र आता इस्रोने आणखी एक ट्वीट केले आहे.

- Advertisement -

इस्रोने ट्वीट करताना म्हटले की, मिशन वेळापत्रकानुसार असून यंत्रणांची नियमित तपासणी सुरू आहे. तसेच सुरळीत नौकानयन सुरू आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) ऊर्जा आणि उत्साहाने गुंजले आहे! MOX/ISTRAC वर लँडिंग ऑपरेशन्सचे थेट प्रक्षेपण 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल. 19 ऑगस्ट 2023 रोजी लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) ने सुमारे 70 किमी उंचीवरून टीपलेल्या चंद्राच्या प्रतिमा याठिकाणी आहेत. LPDC प्रतिमा लँडर मॉड्यूलला ऑनबोर्ड चंद्र संदर्भ नकाशाशी जुळवून त्याचे स्थान (अक्षांश आणि रेखांश) निर्धारित करण्यात मदत करतात, असं ट्वीट इस्रोने केले आहे.

हेही वाचा – Onion Price : केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; ‘या’ ठिकाणी उभारणार विशेष खरेदी केंद्र

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘चांद्रयान-3’चे 14 जुलै 2023 रोजी दुपारी यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपण झाले. त्यानंतर यशस्वीपणे मार्गक्रमण करत या यानाने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू केली. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताच चांद्रयान-3ने चंद्राचे काही फोटो घेतले आहेत, जे इस्रोच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आले होते. त्यापाठोपाठ चांद्रयान-3च्या लँडर इमेजर (LI) कॅमेऱ्याने पृथ्वीचा फोटो पाठवला होता. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी या यानाने पुन्हा एकदा अनोखी छायाचित्रे टिपली होती. एलएचडीए कॅमेऱ्याने टिपलेली ही छायाचित्रे असून त्यात चंद्राचा सुदूर भाग दिसत होता. यानंतर आता यानाने एक व्हिडीओ पाठवला आहे.

- Advertisment -