घर देश-विदेश Chandrayaan-3 : चंद्राच्या पृष्ठभागावर दोन मीटर प्रती सेकंद या वेगाने लँडिंग करू...

Chandrayaan-3 : चंद्राच्या पृष्ठभागावर दोन मीटर प्रती सेकंद या वेगाने लँडिंग करू शकते?

Subscribe

Chandrayaan-3 : चांद्रयान-2 च्या (Chandrayan-2) अपयशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बारीक गोष्टींचा अभ्यास करून चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ची रचना केली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर (Moon Surface) तीन मीटर प्रती सेकंद वेगाने लँडिंग सुरक्षित होण्यासाठी त्यात अतिरिक्त इंधनही देण्यात आले आहे. पण तरीही चांद्रयान-3चे लँडिंग सुरक्षित होणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. असे असले तरी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य ठिकाणी लँडर उतरवण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास Indian Institute of Astrophysicsचे माजी प्राध्यापक आरसी कपूर (RC Kapoor) यांनी व्यक्त केला आहे. (Chandrayaan 3 Can it land on the surface of the moon at a speed of three meters per second)

आरसी कपूर म्हणाले की, सध्या चंद्राभोवती फिरणारे लँडर आणि रोव्हर मागील अपयशापासून शिकून तयार करण्यात आले आहे. चांद्रयान-2 च्या वेळी सर्व चाचण्या आणि तयारी ठीक होती. संपूर्ण जग त्याच्या सॉफ्ट लँडिंगची वाट पाहत होत. परंतु शेवटच्या क्षणी चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त 2.1 किमी अंतरावर लँडरशी संपर्क तुटला. चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले. पण या अपयशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 मध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत, ते अत्यंत मजबूत करण्यात आले आहे, अशी माहिती आरसी कपूर यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan-3 : चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी भारत सज्ज; शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची

सॉफ्ट लँडिंगसाठी प्लॅन बी तयार

आरसी कपूर म्हणाले की, चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने प्लॅन बी तयार केला आहे. ही योजना तेव्हाच अंमलात येईल जेव्हा चंद्रावर महाकाय खड्डा दिसेल. यानंतर प्लॅन बी नुसार, सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया शेवटच्या क्षणी 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात येईल. मात्र, खड्डा खूप मोठा आणि खोल नसेल तर काळजी करण्यासारखे काहीच कारण नसल्याचे सांगताना आरसी कपूर म्हणाले की, लँडिंग करताना प्रत्येक धोका लक्षात घेऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून तयारी करण्यात आली आहे. काही अनपेक्षित घडू नये यासाठी प्लॅन बी तयार केला आहे. गेल्यावेळी लँडिंगसाठी अर्धा किलोमीटर क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले होते, मात्र यावेळी 4 किलोमीटर x 2.4 किलोमीटर क्षेत्रफळ ठरवले आहे. जर रोव्हर खड्ड्यात उतरला तर त्याला बाहेर पडण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे रोव्हरच्या लँडिंगसाठी अशी जागा निश्चित केली आहे जिथे त्याला सूर्यप्रकाश मिळेल.

बूस्टरद्वारे वेग होईल नियंत्रित

- Advertisement -

लखनौच्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेऑलॉजीचे माजी शास्त्रज्ञ डॉ. सीएम नौटियाल यांनी सांगितले की, लँडिंग करताना बूस्टर रॉकेटची मदत घेतली जाते. मात्र बूस्टर रॉकेटचा वापर वेग वाढवण्यासाठी नाही तर वेग नियंत्रित करण्यासाठी केला जातो. विरुद्ध दिशेने बूस्टर केल्यास वेग कमी होत जातो. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना वेग कमी केला जातो. त्यामुळे लँडिंगच्या वेळी दोन मीटर प्रती सेकंदाचा वेग राखला जाणार आहे.

हेही वाचा – Sugar : देशात साखरेची कमतरता नाही, भारतात 330 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज

लँडर आणि रोव्हरला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल

लँडर आणि रोव्हरच्या सोलर पॅनलला पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा यासाठी त्या भागात पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तेव्हाच चंद्रावर लँडर उतरण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. चंद्रावर अनेक महाकाय विवर आहेत. या भागात शतकानुशतके सूर्यप्रकाश खोल खड्ड्यांपर्यंत पोहोचला नाही. तसेच या भागाचे तापमान उणे 245 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते, अशी माहिती डॉ. सीएम नौटियाल यांनी दिली.

खोल अंतराळ संशोधनात उपयुक्त

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल आणि त्याच्या बाजूला असलेल्या रहस्याबद्दल जाणून घेण्यासाठी चांद्रयान-3चे लँडिंग त्याठिकाणी करण्यात येत आहे, कारण ते पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला आहे. याठिकाणी पोहोचण्यात अजूनपर्यंत कोणत्याही देशाला यश आले नाही. त्यामुळे भारताचे चांद्रयान-3 याठिकाणी उतरल्यास तेथे रेडिओ दुर्बिणी बसवून खोल अंतराळातील सिग्नल्स अखंडपणे उपलब्ध होतील, जे भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. तसेच पृथ्वीच्या वातावरणाच्या परिणामांमुळे चांद्रयान-3च्या सिग्नलला त्रास होणार नाही. तसेच LUPEX मिशन चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्रांचे विश्लेषण करून तळ तयार करेल. या तळावरून भविष्यातील संशोधन उपक्रम राबवले जातील. चंद्रावरील बर्फाच्या स्वरूपात पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती संकलित केली जाणार आहे.

- Advertisment -