जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स संमेलनासाठी गेले आहेत. आज ब्रिक्स संमेलनाचा शेवटचा दिवस आहे. भारताच्या चांद्रयान – 3च्या यशानंतर भारताचे अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व राष्ट्र आणि राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोने चंद्र मोहिमेतील ‘चांद्रयान-3’चे विक्रम लँडर बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यानंतर ‘चांद्रयान-3’ चे सॉफ्ट लँडिंग होताच देशभरात आनंद साजरा करण्यात आला
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताच्या चांद्रयान – 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ लँडिंग केली ही फक्त भारतासाठी नाही तर जागातील संपूर्ण वैज्ञानिकांचे खूप मोठे यश आहे. यापूर्वी कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण भारताचा प्रयत्नला यश मिळाले असून या ऐतिहासिक क्षणी तुमच्या मला आणि भारत, वैज्ञानिक आणि जगातील सर्व वैज्ञानिकांकडून ज्या शुभेच्छाचे मिळाल्या. त्याबद्दल मी आणि लोक आणि इस्रोकडून खूप खूप आभार मानतो.”
हेही वाचा – Narendra Modi : नवीन सदस्य जोडल्याने BRICS संघटना मजबूत होईल; पंतप्रधान मोदींना विश्वास
ब्रिक्समध्ये ‘या’ देशाचा समावेश
पंतप्रधानांनी ब्रिक्स परिषदेच्या विस्ताराला समर्थन केले आहे. यावेळी पतंप्रधान म्हणाले, नवीन सदस्य जोडल्याने ब्रिक्स मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ब्रिक्समध्ये सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे. यात इजिप्त, इथिओपिया, इराण, अर्जेंटिना, संयुक्त अरब आणि सौदी अरेबिया या देशांचा ब्रिक्समध्ये समावेश करण्यात आला आहे. या देशांचा समावेश झाल्यानंतर ब्रिक्सचे नाव आता ‘ब्रिक्स प्लस’असे करण्यात आले आहे.
हेही वाचा – BRICS शिखर संमेलनाला सुरुवात, मोदी जोहन्सबर्गला पोहोचले; चीनी राष्ट्रपतींशी करणार द्विपक्षीय चर्चा
ब्रिक्सला नवी गती देऊ
ब्रिक्सच्या विस्तारासाठी आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असे सांगतानाच मोदी म्हणाले की, तीन दिवसांच्या चर्चेतून अनेक सकारात्मक परिणाम समोर आल्याचा मला आनंद आहे. संघटनेतील नवीन सदस्य देशांसोबत काम करून आम्ही ब्रिक्सला नवी गती देऊ शकू, असा मला विश्वास आहे. तसेच या सर्व देशांशी भारताचे अतिशय खोल आणि ऐतिहासिक संबंध असल्याचेही मोदी म्हणाले.