घर देश-विदेश Chandrayaan-3 : ध्येय गाठले; चंद्रावर लँडिंगनंतर चांद्रयान-3ने पाठवला पहिला संदेश

Chandrayaan-3 : ध्येय गाठले; चंद्रावर लँडिंगनंतर चांद्रयान-3ने पाठवला पहिला संदेश

Subscribe

श्रीहरिकोटा : भारताच्या चांद्रयान – 3 यशस्वी लँडिंग झाले आहे. यानतंर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश झाला आहे. चांद्रयान -3 यशस्वी मोहिमेनंतर चंद्रावर जाणारा भारत चौथा देश झाला आहे. “भारत मी यशस्वीरित्या माझे ध्येय गाठवले आणि तुम्ही सुद्धा”, असा मेसेज हा चांद्रयान – 3ने दिला आणि चांद्रयान – 3चे मसेज इस्रोने त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वी केले आहे.

चांद्रयान -3 च्या यशस्वी मोहिमेनंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या चांद्रयान – 3 च्या यशाने देशाला नवी चेतना देणार क्षण आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ” आज भारतासाठी अविस्मरणीय क्षण असून हा क्षण भारताच्या इतिहाससाठी नव्या भारताचा जयघोषाच आहे. आज 140 कोटी लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आजचा हा क्षण भारतात नवा विश्वास, ऊर्जा आणि चेतना देणार आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – भारतासाठी अविस्मरणीय क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

असा घडला चांद्रयान – 3चा प्रवास

- Advertisement -

लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या केल्या पूर्ण

लँडर मॉड्यूलने 5.34 वाजता सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. यामुळे इस्रोने चांद्रयान – 3 ही मोहीम यशस्वीपणे पार पडल्याचा विश्वसा दाखविला.

पॉवर डिसेंटल सुरुवात

इस्रोच्या मिशन कन्ट्रोलने लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटरची कमांड ही 5.44 वाजता दिली. यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर मॉड्यूलने उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर पुढील चार टप्प्यांमध्ये उतरण्याची प्रक्रिया पार पडली. ब्रेकिंग फेज हा पहिला टप्पा होता.

रफ ब्रेकिंग फेज पूर्ण

लँडर मॉड्यूलने रफ ब्रेकिंग फेज 5.56 वाजता यशस्वीपणे पार केली. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंग फेज सुरू करण्यात आला. यात विक्रम लँडरने चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवर नेहऊन 6.8 किमी उंचीवर नेहले. चांद्रयान – 3ने केवळ 10 सेकंदाचा होता.

हेही वाचा – चंद्र आला कवेत; भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग

अल्टिट्यूड होल्डिंग फेज

चांद्रयान – 3 रफ ब्रेकिंग फेजनंतर 5.57 वाजता अल्टिट्यूड होल्डिंग फेजही यशस्वी झाली. यानंतर फाईन ब्रेकिंग फेजला सुरुवात झाली.

फाईन ब्रेकिंग फेज

फाईन ब्रेकिंग फेज ही चांद्रयान – 3ने 5.59 वाजता व्यवस्थितीत पणे पार केले. यानंतर शेवटच्या व्हर्डिकल डिसेंट फेज बाकी होती.

भारताने रचला इतिहास

चांद्रयान – 3 ने लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जवल लँड होणार पहिला देश ठरला आहे.

- Advertisment -