Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3: चांद्रयान- ३ चा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, वाचा पूर्ण टाइमलाइन; 23...

Chandrayaan-3: चांद्रयान- ३ चा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, वाचा पूर्ण टाइमलाइन; 23 ऑगस्ट चंद्रावर होणार लँड

Subscribe

डिबूस्टींग प्रक्रियेच्या यशानंतर आता चंद्रापासून लँडरचे अंतर केवळ 25 किमी आहे. चांद्रयान -3 चा आतापर्यंतचा प्रवास पूर्णपणे यशस्वी झाला आहे. चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

भारताच्या चंद्र मोहिमेचे स्वप्न साकार करण्यात गुंतलेले चांद्रयान-3 आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आता फक्त ३ दिवस उरले आहेत. दरम्यान, यानाच्या ‘विक्रम लँडर’ ने आज दुसरे डीबूस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. डीबूस्टिंग ही एक प्रक्रिया आहे जेव्हा लँडर मॉड्यूलचा वेग कमी करून चंद्राच्या जवळ आणले जाते. या प्रक्रियेच्या यशानंतर आता चंद्रापासून लँडरचे अंतर केवळ 25 किमी आहे. चांद्रयान -3 चा आतापर्यंतचा प्रवास पूर्णपणे यशस्वी झाला आहे. मिशनची संपूर्ण टाइमलाइन जाणून घेऊया. (Chandrayaan 3 How Chandrayaan 3 has been so far read complete timeline August 23 will land on the moon Lunaar Orbit)

विक्रम लँडर केव्हा उतरणार हे इस्रोने सांगितले

चांद्रयान- 3 चे लँडर (विक्रम लँडर) चंद्रावर किती वाजता उतरेल, त्याची निश्चित वेळ आता समोर आली आहे. इस्रोने एका पोस्टमध्ये सांगितले आहे की लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

अनेक टप्पे पूर्ण केले

- Advertisement -

चांद्रयानाने प्रक्षेपण केल्यापासून अनेक मोठे टप्पे पूर्ण केले आहेत. या वाहनाने यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करून मोठा टप्पा पूर्ण केला होता. यानंतर त्याने 5 कक्षांमध्ये प्रवेश केला. यानंतर, 17 ऑगस्ट रोजी, लँडर आणि रोव्हर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले.

ही आहे संपूर्ण टाइमलाइन

  • इस्रोने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित केले आणि ते पृथ्वीभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सोडले.
  • 15 जुलै रोजी, इस्रोने पृथ्वीच्या दिशेने अंतराळ यानाला पुढे नेण्यासाठी पहिली प्रक्रिया (अर्थबाउंड फायरिंग-1) पूर्ण केली.
  • 1 ऑगस्ट रोजी चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेकडे वळले.
  • ५ ऑगस्ट रोजी या यानाने चंद्राच्या पहिल्या 40 हजार किमीच्या कक्षेत प्रवेश केला.
  • 6 ऑगस्ट रोजी यान दुसऱ्या 20 हजार किमीच्या कक्षेत पोहोचले.
  • ९ ऑगस्टला यानानं तिसरी कक्षा बदलली आणि ५ हजार किमीच्या कक्षेत प्रस्थापित झालं आणि त्यानंतर 14 ऑगस्टला 1 हजार किमीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
  • 16 ऑगस्ट रोजी कक्षा बदलून, ते चंद्राच्या सर्वात जवळच्या 100 किमीच्या कक्षेत स्थापित केले गेले.
  • 17 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले. लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकत आहे.
  • 18 ऑगस्ट रोजी, विक्रम लँडर डीबूस्टिंग प्रक्रियेतून गेला, जो यशस्वी झाला.
  • 20 ऑगस्ट रोजी, लँडरने दुसऱ्यांदा डीबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आणि चंद्राच्या अगदी जवळ पोहोचला.
  • विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मीनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

विक्रम लँडरची ही आहे खासियत

विक्रम लँडर हे एक अतिशय खास आणि उपयुक्त अंतराळयान आहे. चंद्राभोवती प्रदक्षिणा केल्यानंतर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. यामध्ये चंद्रावरील प्लाझ्मा, पृष्ठभागावरील उष्णता, चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व, भूकंप आणि चंद्राची गतिशीलता यांचा अभ्यास करणारी उपकरणे आहेत.

…तर भारत इतिहास घडवेल

- Advertisement -

आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनने त्यांचे लँडर्स चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमच्या लँडिंगसह, भारत असे करणारा जगातील चौथा देश बनेल. यापूर्वी, चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत, भारताने 2019 मध्ये लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी लँडरशी संपर्क तुटला आणि तो क्रॅश झाला.

- Advertisment -