घर देश-विदेश Chandrayaan-3 : चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी भारत सज्ज; शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची

Chandrayaan-3 : चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी भारत सज्ज; शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची

Subscribe

Chandrayaan-3 : भारत (India) अवघ्या काही तासांवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. जे काम अमेरिका, चीन आणि रशिया जमले नाही ते काम आता इस्रोचे शास्त्रज्ञ (ISRO) करणार आहेत. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर असणार आहे. कारण आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. (Chandrayaan 3 India ready to hoist tricolor on moon The last 15 minutes are important)

विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने सर्व तयारी पूर्ण केली असून ते आज संध्याकाळी 6.04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. इस्रो केंद्रात चांद्रयान-३ चे सतत निरीक्षण केले जात आहे. आतापर्यंत सर्व काही योजनेनुसार सुरू आहे. विक्रम लँडरचे सर्व भाग व्यवस्थित काम करत आहेत आणि आज काही कारणास्तव यशस्वी लँडिंग शक्य झाले नाही तर, इस्रोने प्लॅन बी तयार केला आहे. प्लॅन बीनुसार इस्रो येत्या 27 ऑगस्टला चांद्रयान-3 चे लँडिंग करेल.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan-3 : चंद्राच्या पृष्ठभागावर दोन मीटर प्रती सेकंद या वेगाने लँडिंग करू शकते?

4 टप्प्यांत पूर्ण होणार लँडिंग 

विक्रम लँडरचे लँडिंग 4 टप्प्यात होणार असून लँडरचा वेग कमी करून ते चंद्राच्या पृष्ठभागावर आणले जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात लँडरचा 30 किमीवरून 7.5 किमी उंचीवर येईल. दुसऱ्या टप्प्यात विक्रम लँडर 7.5 किमी ते 6.8 किमी उंचीवर येईल. तिसऱ्या टप्प्यात 6.8 किमी ते 800 मीटर उंचीवर येईल. चौथ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर 800 मीटर उंचीवर 150 मीटर उंचीपर्यंत येईल.

शेवटची 15 मिनिटे का महत्त्वाची?

- Advertisement -

अंतराळ तज्ज्ञ प्रोफेसर आरसी कपूर यांनी सांगितले की, चंद्रावर विक्रम लँडरच्या लँडिंगची शेवटची 15 मिनिटे खूप महत्त्वाची असणार आहेत. चांद्रयान-3 जेव्हा पहिल्या टप्प्यात उतरण्यास सुरुवात करेल, तेव्हा त्याचा वेग 1683 मीटर प्रती सेकंद असेल. यानंतर ते 7.4 किमी उंचीपर्यंत खाली आणले जाईल. त्यानंतर लँडरचा वेग 375 मीटर प्रती सेकंद इतका कमी करण्यात येईल. याठिकाणी विक्रम लँडरची उंची निश्चित केली जाईल म्हणजेच ते चंद्राच्या पृष्ठभागावर झुकले जाईल. त्यानंतर विक्रम लँडर 1300 मीटर उंचीवर आणले जाईल. त्यानुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्याचा वेग हळूहळू कमी होईल, नंतर ते 400 मीटर, 150 मीटर आणि नंतर 50 मीटरपर्यंत आणले जाईल. शेवटी 10 मीटरवर आल्यानंतर अंतिम लँडिंग केले जाईल. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्थ करेल तेव्हा विक्रम लँडरचा वेग 2 मीटर प्रती सेकंद इतका असेल, अशी माहिती आरसी कपूर यांनी दिली.

हेही वाचा – Sugar : देशात साखरेची कमतरता नाही, भारतात 330 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज

चंद्राच्या सर्वात धोकादायक ठिकाणी होणार चांद्रयान-3चे लँडिंग

चांद्रयान-3 चे विक्रम लँडरचे लँडिंग चंद्राच्या सर्वात धोकादायक ठिकाणी होणार आहे. नासाच्या माहितीनुसार, चंद्राचा दक्षिण ध्रुव रहस्य, विज्ञान आणि कुतूहलाने भरलेला आहे. त्यामुळे चांद्रयान-3 चे लँडिंगनंतर संपूर्ण जगाला इतिहास घडताना पाहायचा आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप खोल खड्डे आहेत. कोट्यवधी वर्षांपासून या भागात सूर्यप्रकाश पोहोचलेला नाही. येथील तापमान उणे 248 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग गरम करण्यासाठी वातावरण नाही. त्यामुळे इस्रोकडून घाईघाईने पावले उचलली जात आहेत. चांद्रयान-2 दरम्यान झालेली चूक पुन्हा होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

- Advertisment -