घर देश-विदेश Chandrayan 3 : भारताचं चंद्रावर Moon Walk; इस्रोने ट्वीट करत दिली माहिती

Chandrayan 3 : भारताचं चंद्रावर Moon Walk; इस्रोने ट्वीट करत दिली माहिती

Subscribe

Chandrayan 3 : Chandrayan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यासह भारत (India) हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. त्यामुळे इस्रोने (ISRO) ट्वीट करत भारताचं चंद्रावर मून वॉक सुरू असल्याचे म्हटले आहे. (Chandrayaan 3 Indias Moon Walk on the Moon ISRO tweeted the information)

‘चांद्रयान-3’ ने बुधवारी (23 ऑगस्ट) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. सध्या प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडले असून ते चंद्राच्या पृष्ठभागावरील खडक आणि खड्ड्यांभोवती फिरत आहे. चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग झाल्यानंतर काही तासांनंतर ‘चांद्रयान-3’ चा हा पुढचा यशस्वी टप्पा सुरू झाला आहे. त्यानंतर आज सकाळी इस्रोने ट्वीट करत म्हटले की, चंद्रासाठी बनवलेले मेड इन इंडिया ‘चांद्रयान-3’ रोव्हर लँडरवरून खाली उतरले असून सध्या ते चंद्रावर फेरफटका मारत आहे.

- Advertisement -

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश

बुधवारी (23 ऑगस्ट) ‘चांद्रयान-3’ ची लँडिंग प्रक्रिया पहाटे 5.30 वाजता (चंद्रावरील वेळेनुसार) सुरू झाली. रफ लँडिंग खूप यशस्वी झाल्यानंतर लँडरने पहाटे 5.44 वाजता उभी लँडिंग केली. तेव्हा चंद्रापासून ‘चांद्रयान-3’ चे अंतर 3 किमी होते. ‘चांद्रयान-3’ ने आपल्या 20 मिनिटांत चंद्राच्या शेवटच्या कक्षेतून 25 किमीचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. लँडरने संध्याकाळी 6.04 वाजता (भारतीय वेळेनुसार) चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे हा पराक्रम करणारा भारत जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवावर पोहचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) चे एकूण वस्तुमान 1,752 किलो इतके आहे. चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी एका चंद्र दिवसासाठी म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवस ऑपरेट करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -