घर देश-विदेश Chandrayaan-3 : गेल्या मोहिमेच्या अपयशातून शिकलो अन्... इस्रोच्या माजी संचालकांनी दिली माहिती

Chandrayaan-3 : गेल्या मोहिमेच्या अपयशातून शिकलो अन्… इस्रोच्या माजी संचालकांनी दिली माहिती

Subscribe

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 बाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. इस्रोचे माजी संचालक के सिवन यांनी या मोहिमेबद्दलची माहिती दिली. गेल्या चांद्रयान -2 मोहिमेतील अपयशातून धडा घेत आम्ही पावले उचलली. त्याचे परिणाम दिसत आहेत. आता हे अंतराळयान खूप चांगले काम करत आहे. या मोहिमेच्या यशासाठी आम्ही केलेले बदल खूप फायदेशीर ठरले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

आम्ही मागील मोहिमेतील लँडिंग प्रक्रियेनंतरच्या डेटाचा अभ्यास केला. त्याच्या आधारे या मोहिमेत सुधारणा केल्या आहेत. इतकेच नव्हे, आणखीही काही सुधारणा त्यात करण्यात आल्या आहेत. जिथे मार्जिन कमी होती, तिथे आम्ही ती मार्जिन वाढवली ​​आहे… चांद्रयान -2पासून धडा घेत, आम्ही पावले उचलली आणि त्याआधारे सिस्टीम अधिक मजबुतीने प्रगती करत आहे, असे के. सिवन यांनी सांगितले.

चंद्राचे फोटो इस्रोने केले शेअर
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘चांद्रयान-3’चे 14 जुलै 2023 रोजी दुपारी यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपण झाले. त्यानंतर यशस्वीपणे मार्गक्रमण करत या यानाने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू केली. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताच चांद्रयान-3ने चंद्राचे काही फोटो घेतले आहेत, जे इस्रोच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आले होते. त्यापाठोपाठ चांद्रयान-3ने शनिवारी (19 ऑगस्ट 2023) चंद्राची काही छायाचित्रे टिपली आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी सकाळी सोशल मीडियावरून ही छायाचित्रे शेअर केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -