घर देश-विदेश चांद्रयान-3 मोहिमेला मोठं यश; विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून यशस्वीरित्या विलग

चांद्रयान-3 मोहिमेला मोठं यश; विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून यशस्वीरित्या विलग

Subscribe

चांद्रयान -3 मोहिमेत इस्रोला मोठं यश मिळालं आहे. चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर हे प्रोपल्शन मॉडेलपासून यशस्वीरित्या विलग झालेलं आहे. आता हे यान लवकरच चंद्रावर उतरणार आहे. इस्रोने ट्वीट करत चांद्रयान-3 संदर्भातील माहिती दिली आहे.

चांद्रयान -3 मोहिमेत इस्रोला मोठं यश मिळालं आहे. चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर हे प्रोपल्शन मॉडेलपासून यशस्वीरित्या विलग झालेलं आहे. आता हे यान लवकरच चंद्रावर उतरणार आहे. इस्रोने ट्वीट करत चांद्रयान-3 संदर्भातील माहिती दिली आहे. विक्रम लँडर हे प्रोपल्शन मॉडेल यशस्वीरित्या वेगळं झाल्यानं आता ही मोहिम नियोजित वेळेत पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता चांद्रयान चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. (Chandrayaan 3 mission a big success Vikram Lander successfully separated from propulsion model Lunar Orbit)

इस्रोचं ट्वीट काय?

इस्रोने याआधी सांगितलं होतं की, 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळा होईल. इस्रोने ट्वीट करत लिहिलं आहे की, लँडर मॉड्यूल म्हणालं आहे की, प्रवासासाठी धन्यवाद, मित्रा. लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूल पासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता नियोजित डीबूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल चंद्रपासून जवळच्या कक्षेत लँडिंगसाठी सेट करण्यात येणार आहे.

- Advertisement -

14 जुलै रोजी भारताचं चांद्रयान-3 हे चंद्राच्या दिशेनं झेपावलं आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स, इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क, बंगळुरूकडून हे यान लॉन्च करण्यात आलं असून येथूनच कंट्रोल केलं जात आहे. मॉड्यूलपासून लँडर वेगळा झाल्यानंतर  चांद्रयान-3 चं वजन 3900 वरून 2100 किलोवर येणार आहे. चंद्रावर विक्रम लँडर उतरल्यावर काही तासांनी लँडरच्या पोटातून प्रज्ञान नावाचा रोव्हर बाहेर पडत चांद्र भूमिवर संचार करणार आहे.

- Advertisement -

मॉड्युलपासून लँडर वेगळा झाल्यानंतर चांद्रयान-3 चंद्रापासून 100 किलोमीटरच्या कक्षेत पोहोचणार आहे. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं जाणार आहे. लँडिंग करण्यापूर्वी चांद्रयानचे प्रोपल्शन मॉड्यूल वेगळं झाल्यानंतर यानाचे वजन 2100 किलो इतकं होणार आहे.

चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरू केला. चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चांद्रयान-3 हे 23 ऑगस्टला संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.

( हेही वाचा: दहा वर्षे सत्ता भोगूनही…, घराणेशाहीवरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल )

- Advertisment -