Chandrayaan-3: भारताचं चांद्रयान-3 हे यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं आहे. जिथे कोणत्याही देशाला जाता आलं नाही, तिथे भारतानं आपलं लँडर उतरवलं आहे आणि इतिहास आपल्या नावावर लिहिला आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक संपूर्ण जगातून होत असताना, भारतात आता चांद्रयान-3 वरूनही राजकारण सुरू झालं आहे. चांद्रयान-3 चं यश हे नेहरुंमुळे आहे, असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत. तर आता भाजपच्या नेत्यांनीही चांद्रयान-3 चं श्रेय माजी पंतप्रधाना अटल बिहारी वाजपेयींना दिलं आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी चांद्रयान- 3 च्या यशाचे श्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दिलं. मेघवाल म्हणाले की, चांद्रयान चंद्रावर नेण्याची वाजपेयींची कल्पना होती. (Chandrayaan 3 Nehru Should givern credit but Chandrayaan was Atal Bihari Vajpayee idea said by ram meghwal ISRO)
ज्याने इस्रोची स्थापना त्याला सर्व श्रेय
इस्रोची स्थापना कोणी केली त्याला श्रेय दिलं पाहिजे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. ते म्हणाले की, हे देशासाठी केलेले काम आहे, मात्र चांद्रयान हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची विचारसरणी होती. अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, पहिल्या वैज्ञानिक चांद्रयान मोहिमेचे नाव ‘सोमयान’ ठेवण्यात आले होतं पण माजी पंतप्रधान वाजपेयी जेव्हा शास्त्रज्ञांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना चांद्रयान नाव ठेवण्यास सांगितलं आणि त्यानंतर चांद्रयानाला हे नाव देण्यात आले. या नावाने मिशन यशस्वी होईल, असे वाजपेयी म्हणाले होते.मेघवाल म्हणाले की माजी पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना सांगितले होते की सोमचा अर्थ चंद्र देखील आहे, परंतु चांद्रयान हे चांगले नाव असेल.
चांद्रयान हे नाव अधिक यशस्वी होईल आणि हे अभियानही यशस्वी होईल, असे वाजपेयी म्हणाले होते. त्यामुळे अटलजींचे नाव घेण्यात राजकारण नाही, ज्याने काम केले त्याचे श्रेय त्यालाच द्यावे लागेल, असे केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा: Chandrayaan 3 चा चंद्रावर फेरफटका; प्रवास करताना सोडणार भारताच्या ‘या’ खुणा )