Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3 : आता इस्रो चंद्रावर मानव पाठवू शकणार; विक्रम लँडरचा प्रयोग यशस्वी;...

Chandrayaan-3 : आता इस्रो चंद्रावर मानव पाठवू शकणार; विक्रम लँडरचा प्रयोग यशस्वी; नवी अपडेट समोर

Subscribe

रतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्रावर मानव पाठवण्याबाबत मोठे यश मिळवले आहे. चांद्रयान-३ अंतर्गत चंद्रावर उतरलेल्या विक्रम या लँडरने यशस्वी प्रयोग केल्याचे इस्रोने म्हटले आहे. लँडरने त्याचे इंजिन दिलेल्या कमांडनुसार फायर केलं तसंच, काही अंतरावर यशस्वीरित्या प्रवास केला. विक्रम लँडरच्या या यशस्वी आणि महत्त्वाच्या प्रयोगामुळे आता इस्रोला चंद्रावर माणूस पाठवता येणार आहे.

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्रावर मानव पाठवण्याबाबत मोठे यश मिळवले आहे. चांद्रयान-३ अंतर्गत चंद्रावर उतरलेल्या विक्रम या लँडरने यशस्वी प्रयोग केल्याचे इस्रोने म्हटले आहे. लँडरने त्याचे इंजिन दिलेल्या कमांडनुसार फायर केलं तसंच, काही अंतरावर यशस्वीरित्या प्रवास केला. विक्रम लँडरच्या या यशस्वी आणि महत्त्वाच्या प्रयोगामुळे आता इस्रोला चंद्रावर माणूस पाठवता येणार आहे. (Chandrayaan 3 Now ISRO will be able to send humans to the moon Vikram Lander experiment successful)

इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, विक्रम लँडर हे ध्येय उद्दिष्टांच्या दिशेन योग्य वाटचाल करत आहे. विक्रम लँडरने हॉप म्हणजेच उडी मारण्याचा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला आहे. इस्रोने सांगितले की, कमांड मिळाल्यावर, लँडरने आपलं इंजिन सुरू केले, अपेक्षेप्रमाणे 40 सेमीपर्यंत उडी मारली आणि 30-40 सेमी अंतरावर सुरक्षितपणे उतरवले. त्यामुळे विक्रम लँडरच्या या प्रयोगामुळे इस्रोला आता अनेक महत्त्वाच्या योजनासांठी मदत होणार आहे.

- Advertisement -

इस्रोने पुढे या प्रयोगाला एक महत्त्वाची ‘किक-स्टार्ट’ म्हणून संबोधले आणि म्हटले की, भविष्यात मानवयुक्त मोहिमांसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. इस्रोने सांगितले की, सर्व यंत्रणांनी चांगले काम केले आणि लँडर निरोगी आहे. प्रयोगानंतर, तैनात केलेले उतार, chaSTE आणि ILSA परत दुमडले गेले आणि यशस्वीरित्या पुन्हा तैनात केले गेले.

हे यश विशेष का आहे?

चंद्रावर मानवयुक्त मोहीम पाठवण्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे तेथे उतरल्यानंतर मानवाचे पृथ्वीवर परतणे. वास्तविक, चंद्रावर उतरल्यानंतर, परत येण्यासाठी, तेथे उपस्थित असलेले वाहन चंद्राच्या पृष्ठभागावरून प्रक्षेपित करून चंद्राच्या कक्षेत न्यावे लागते. जिथे दुसरा मॉड्यूल त्याची वाट पाहत असतो. इथे दोघे जोडले जातात आणि मग पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू होतो. अमेरिकेने पाठवलेल्या अपोलो मिशनमध्ये ही प्रक्रिया वापरण्यात आली होती.

- Advertisement -

भविष्यात मानवाला चंद्रावर पाठवण्याचेही इस्रोचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-३ च्या लँडरने पृष्ठभागावर चढून इस्रोच्या आशांना पंख दिले आहेत. चंद्रावर आपले अंतराळ यान उतरवण्याची क्षमता इस्रोकडेही आहे हे या प्रयोगाने सिद्ध केले आहे.

(हेही वाचा: चांद्रयान – 3 मोहीम प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनची घोषणा करणाऱ्या एन. वलरमथींचे निधन )

- Advertisment -