Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चांद्रयान-3: प्रज्ञान रोव्हरने घेतला विक्रम लॅंडरच पहिला फोटो; इस्रोने केला शेअर

चांद्रयान-3: प्रज्ञान रोव्हरने घेतला विक्रम लॅंडरच पहिला फोटो; इस्रोने केला शेअर

Subscribe

23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतरलेल्या विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून मिळालेली माहिती दररोज इस्रो त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर शेअर करत आहे.

बंगळुरू : जशा गमंती जमंती माणसं पृथ्वीवर करतात अगदी तशाच गमंती-जमंती सध्या दुर अवकाशातील चंद्रावरही सुरू आहेत. तुम्ही म्हणाल या गमंती-जमंती कोणामध्ये सुरू आहेत. तर त्या सुरू आहेत आपण पाठवलेल्या प्रज्ञान रोव्हर आणि लॅंडर विक्रममध्ये. झाले असे की, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतलेल्या विक्रम लॅंडरचा पहिला फोटो प्रज्ञान रोव्हर घेतला असून, तो फोटो भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोन ट्वीट करत शेअर केला असून, त्याला स्माईल प्लीज असे कॅप्शन दिले आहे.(Chandrayaan-3: Pragyan rover takes first photo of Vikram lander; ISRO shared)

23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतरलेल्या विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून मिळालेली माहिती दररोज इस्रो त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर शेअर करत आहे. दरम्यान 30 ऑगस्ट रोजी रोव्हरवर बसवण्यात आलेल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्याने विक्रम लॅंडरचे छायाचित्र काढल्याचे इस्रोने सांगितले. इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्सच्या प्रयोगशाळेने हा विशेष कॅमेरा विकसित केला आहे. इस्रोने सांगितले की, रोव्हर प्रज्ञानने 30 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 7.35 वाजता हा फोटो घेतला.

काल दिली होती सल्फर असल्याची माहिती

- Advertisement -

चांद्रयान-3 मोहीमेमधील प्रज्ञान रोव्हर रोज चंद्रावरील मनोरंजक अशी माहिती इस्रोला पाठवत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असलेल्या रोव्हर प्रज्ञानने दक्षिण ध्रुवावर सल्फरच्या अस्तित्वाची माहिती काल दिली होती. अंतराळवीर टी.व्ही. वेंकटेश्वरन यांनी सांगितले की, रोव्हरने चंद्रावर काही विशेष घटक शोधले आहेत. आता ते चंद्राच्या पृष्ठभागावर अधिक ठिकाणी जाईल आणि घटकांची रचना आणि एकाग्रतेबद्दल माहिती मिळवणार आहे.

हेही वाचा : तोशखाना प्रकरणी हायकोर्टाने सुटकेचे आदेश देऊनही इम्रान खान तुरुंगातच! कारण…

असा आहे आपला प्रज्ञान रोव्हर

- Advertisement -

चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाठविण्यात आलेल्या प्रज्ञान रोवरचे वजन 26 किलो असून, 3 फूट लांब, अडीच फूट रुंद आणि 2.8 फूट ऊंच आहे. याशिवाय प्रज्ञानला 6 पाय लावण्यात आले आहे.

हेही वाचा : China’s New Map : भारताचा विकास पचनी पडत नाही, भाजपाची राहुल गांधींवर टीका

असा आहे रोव्हरचा वेग

प्रज्ञान रोवर चंद्रावर लँडरपासून 500 मीटरपर्यंत जाऊ शकतो. रोवरचा वेग 1 सेमी प्रति सेकंद आहे. चंद्रावरील चांद्रयान मोहीम पृथ्वीवरील दिवसांचा विचार केला असता ती 14 दिवसांची आहे. चांद्रयान 3 चंद्रावर उतरल्यानंतर दुसरा आठवडा सुरु झाला आहे.

- Advertisment -