बंगळुरू : चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर भारताने पाठविलेल्या चांद्रयान-3 या आंतरराळ यानाने भारतीय वैज्ञानिक संस्था इस्रोला (ISRO) ला मोठी माहिती पाठवली आहे. या पाठविलेल्या संदेशामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर किती सेल्सीअस तापमान आहे याबाबत माहिती असून, त्या माहितीवर इस्रोतील वैज्ञानिकांकडून अभ्यास सुरू आहे. (Chandrayaan-3 sends big information to ISRO; Told- What is the temperature at the South Pole…)
चांद्रयान-3 कडून इस्रोला आलेल्या संदेशामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रृवावरील चंद्राच्या जवळील आणि आजुबाजुच्या परिसरात कसे तापमान असते याचा एक ग्राफ पाठविला असून, त्यातून तेथील वातावरणाची स्थिती अधोरेखीत केली आहे. हे तापमान वेगवेगळ्या ठिकाणचे असून, त्याचे रेकॉर्ड बनवले आहे. तर इस्रोने म्हटले आहे की, अशाप्रकारची माहिती ही चंद्राच्या दक्षिण ध्रृवावरील पहिली माहिती असून, या माहितीवर सध्या अभ्यास सुरू आहे.
Chandrayaan-3 Mission:
Here are the first observations from the ChaSTE payload onboard Vikram Lander.ChaSTE (Chandra’s Surface Thermophysical Experiment) measures the temperature profile of the lunar topsoil around the pole, to understand the thermal behaviour of the moon’s… pic.twitter.com/VZ1cjWHTnd
— ISRO (@isro) August 27, 2023
10 सेमीच्या खोलीपर्यंतचे मोजू शकते तापमान
चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाठवलेल्या चांद्रयान-3 चे विक्रम लॅंडरवर ChaSTE हे दक्षिण ध्रृवाच्या आसपासची चंद्रावरील मातीचे परीक्षण करत आहे. या मातीचे परीक्षण करून किती तापमान आहे याची माहिती कळते. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभआगावरील तापमानाची माहिती कळते. ChaSTE पेलोड हे एक तापमान मोजक यंत्र असून, ते 10 सेमीपर्यंत खोलवर जाऊन तापमान मोजते. एकुणच ChaSTE पेलोडवर 10 वेगवेगळे तापमान मोजण्याचे सेंसर लावण्यात आले असून, त्याद्वारे माहिती मिळत आहे.
हेही वाचा : दोन-तीन वर्षे खूप संघर्ष केला आणि…, कोल्हापूरच्या अभिज्ञाने पंतप्रधानांना सांगितली ‘मन की बात’
50 सेल्सीअसपर्यंत तापमानाची माहिती
विक्रम लॅंडरवर लावण्यात आलेल्या ChaSTE पेलोडकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्राच्या पृष्ठभागावर 50 सेल्सीअसपर्यंत तापमान आहे. आणखी खोलवर गेल्यानंतर या तापमानामध्ये कमी होते. तर मिळालेल्या माहितीच्या आधारे 80 मिली मीटरपर्यंत आत गेल्यानंतर तापमान हे केवळ 10 सेल्सीअसपर्यंत जाते. एकुणच चंद्राचा पृष्ठभाग हा तापमान टिकून ठेवण्यास असक्षम ठरत असल्याचे दिसून येते.
हेही वाचा : मराठी माणसाने ‘हे’ विसरता कामा नये, नितीन देसाईंच्या आत्महत्येवरून संजय राऊत आक्रमक
मन की बातमध्ये चांद्रयान-3 चा उल्लेख
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या त्यांच्या कार्यक्रमातून देशवासीयांसोबत संवाद साधला.यावेळी त्यांनी इस्रोने केलेल्या चांद्रयान-3 च्या अभूतपूर्व यशाचीह उल्लेख त्यांच्या या संवादातून केला. यावेळी त्यांनी चंद्रयान-3 च्या यशासाठी लढणाऱ्या नारीशक्तीचाही उल्लेख केला.